आपला बीड जिल्हा
केजचे नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांची विभागीय चौकशी !
पंधरा दिवसात चौकशी करून अहवाल सादर करा , विभागीय आयुक्तांचे आदेश
स्वाभिमानी च्या बेमुदत आंदोलनाची विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांनी घेतली दखल
वादळवार्ता प्रतिनिधी – शाहेद खतीब
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनयम1960 कलम 155 अन्वये मौजे उमरी ता. केज जि. बीड येथील सर्वे नंबर 79/1मधिल क्षेत्र दुरुस्ती प्रकरणात एकतर्फी निर्णय देणारे नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांची 15 दिवसात उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून कारवाईचा अहवाल सादर करण्याचे मा. विभागीय आयुक्त औरंगाबाद कार्यालयाने दि.1जून 2022 रोजी जिल्हाधिकारी बीड यांना आदेश दिले आहेत.
- अनेक वर्षांपासून केज तहसील कार्यालयात ठाण मांडून बसलेले नायब तहसिलदार श्री. सचिन देशपांडे विरोधात शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी प्राप्त होत्या ,गोर गरीब शेतकऱ्यांचे क्षेत्र दुरुस्ती, रस्ते आदी महसूली अर्धन्यायिक प्रकरणात पैसे घेऊन निर्णय देणे ,हेकेखोरपणा करून सामान्य जनतेची प्रशासकीय हेळसांड करणे ,राजकीय पुढाऱ्यांच्या आश्रयाने प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोडी करून कामे करणे आदी. गंभीर विषयावर स्वाभिमानी पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादविभागीय आयुक्त कार्यालयासमोर दि.29 जून 2022 पासून बेमुदत धरणे आंदोलन चालू केले होते.सदर आंदोलनाची दखल घेऊन मा.सुनिल केंद्रेकर विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी संबंधित प्रकरणात 15 दिवसात कायदेशीर कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी ,बीड यांना आदेश दिले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांचे नेतृत्वाखाली धरणे आंदोलनात औरंगाबाद शहर जिल्हाध्यक्ष अब्दुल रउफ ,केज शहराध्यक्ष फेरोजभाई पठाण ,जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद पांचाळ, मनोहर भैरट,भारत भैरट,राजाभाऊ भैरट,अरूण भैरट,शिवकुमार भैरट,कमलाकर भैरट,सुग्रीव भैरट, इंद्रजित भैरट, रोहन भैरट, अनिल भैरट,अशोक मुळे, शंकर पुरी,गोकुळ मुळे, विक्रम मुळे, अश्विनी भैरट, मंगल भैरट, जनाबाई भैरट, परीमाळा साखरे,स्वाती भैरट, संगीता भैरट, रुक्मिणी भैरट, दैवशाला भैरट, मनीषा भैरट,सारिका भैरट,सरोजा भैरट, आदी आंदोलकर्ते ,शेतकरी सहभागी झाले होते.