वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
गणेशोत्सव साजरा करीत असताना गणेश मंडळाणी सामाजिक प्रबोधन करणारे देखावे सादर करून सादर करून शांतता व सुव्यस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी साळेगांव ता केज येथील बैठकीत बोलताना केले .
साळेगांव ता केज येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दि.२९ ऑगस्ट सोमवार रोजी साळेगांव ता. केज येथे सहायक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीचे अध्यक्षस्थानी सरपंच कैलास जाधव होते.
यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी सर्वजनिक शांतता, गणेशोत्सवाचा ऑनलाईन परवाना, आदर्श गणेशोत्सव, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी स्त्री व पुरुषांच्या स्वतंत्र व्यवस्था याची माहिती दिली. तसेच आणि सार्वजनिक शांतता, सामाजिक सलोखा, स्त्री भ्रूण हत्या या बाबतचे देखावे. मिरवणुकीचे रस्ते व विसर्जनाचे ठिकाण याची व्यवस्था. या बाबत मार्गदर्शन केले. या बैठकीला उपसरपंच अमर मुळे, माजी सरपंच नारायण लांडगे, माजी गटविकास अधिकारी जयलिंग स्वामी, अशोक गित्ते, ग्रामसेवक ओम चोपणे, राजू गुंजाळ, चंद्रकांत काळकुटे, शेख मतीन, हनुमंत चादर, संभू सरवदे, लिंबाजी बचुटे, अनिल महाजन, जय जोगदंड, गजानन इंगळे, भागवत मुळे, दत्ता तोंडे, हनुमंत ताकतोडे, गणेश गालफाडे, गोरख घाटूळे यांच्यासह गावातील प्रमुख नागरिक उपस्थित होते.
बैठकीचे प्रास्ताविक आणि संचलन पत्रकार गौतम बचुटे यांनी तर आभार उपसरपंच अमर मुळे यांनी व्यक्त केले.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!