आपला बीड जिल्हा

हादगाव येथील शाळेची उज्ज्वल परंमपरा दहावी मध्ये उत्कृष्ट गुण घेणाऱ्या विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोह

वादळवार्ता वार्तांकन – केज

संत रामकृष्ण महाराज विद्यामंदिर हादगांव या शाळेमध्ये ध्वजारोहणा च्या कार्यक्रमासाठी एक नवीन संकल्पना सुरु करण्यात आली, इयत्ता दहावी मध्ये शाळेतून सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थी व पालक यांच्या हस्ते स्वतंत्र दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले होते तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे ध्वजारोहण १० वी. मध्ये चौथ्या क्रमांक मिळवलेल्या मुलीच्या हस्ते करण्यात आले.

केज तालुक्यातील हदगाव येथील संत रामकृष्ण महाराज विद्यामंदिर चे मुख्याध्यापक कै. जाधवर सर यांची संकल्पना होती की शाळेमधून इयत्ता दहावी मध्ये प्रथम,दुसरा,तिसरा व चौथा क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावे. या संकल्पने अंतर्गत ८९ टक्के गुण मिळवून कु.पूनम बालासाहेब वाघमारे व शाळेच्या मुख्याध्यापीका डापकर मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.

विद्यार्थ्यांमध्ये अभ्यास करण्याची स्पर्धा निर्माण होऊन आपल्या हस्ते शाळेचे ध्वजारोहण करण्याची जिद्द निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाचे गावातील सर्व नागरिकांनी कौतुक केले आहे.

कार्यक्रमासाठी गावचे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य गावातील शिक्षण प्रेमी व शाळेचे मुख्याध्यापक सर्व कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!