प्रतिनिधी बीड,
मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागात केज तालुक्यातील गोटेगाव येथील शेतमजुराचा मुलगा, अत्यंत गरिबीची हालाखीच्या परिस्थितीमध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन चरित्राच्या प्रेरणेतून शिक्षण घेऊन वकील बनण्याची जिद्द मनामध्ये बाळगून गोटेगावचे सुपुत्र ऍड. तुषार छत्रभुज बचुटे याने कष्ट करून शिक्षण घेत एलएलबी ही पदवी मिळविली आहे. ठाणे! जिल्ह्यातील भिवंडी या ठिकाणी
श्री इंद्रापाल बाबुराव चौघुले विधी महाविद्यालय या महाविद्यालयात चिकाटीने व जिद्दीने शिक्षण घेत गगनाला गवसणी घातली आहे.
प्राचार्य ऍड.गायत्री पाटील मॅडम तुषार यांचे कौतुक केले आहे. शिक्षण घेत असताना तुषारला बऱ्याच अडचणी आल्या त्याने जिद्द सोडली नाही. त्यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष महेश भारतीय, अक्षय गोटेगावकर, प्रीतम बचुटे, शुभम बचुटे , दीपक बचुटे यांचे तुषारला वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन मिळाले. गोटेगावचे सर्व ग्रामस्थ, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष महेश भारतीय यांनीही तुषारचे अभिनंदन, कौतुक केले आहे. गोरगरीब वंचित नागरिकांना न्याय मिळावा तसेच भारतीय संविधानाचा प्रचार व प्रसार करून गरीब मुलांना शिक्षणामध्ये मदत करणार असल्याचे ऍड. तुषार छत्रभूज बचुटे यांनी सांगितले.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!