Uncategorized

शारदा इंग्लिश स्कूल केज येथे विज्ञान प्रदर्शन थाटात संपन्न…

वादळवार्ता – केज दि.१२

देशात सर्वत्र तंत्रज्ञान व आधुनिक साधनाची वाढती व्याप्ती व गरज पाहता अधिकाधिक संशोधन व नवनवीन शोध झाले पाहिजे विध्यार्थी व शिक्षक यांच्या सहकार्याने दरवर्षी आयोजित केले जाणारे विज्ञान प्रदर्शन अत्यंत उपयुक्त असून विज्ञान संशोधन भविष्यासाठी नव्हे तर आज आत्ताच्या काळाची गरज बनली आहे. तंत्रज्ञान म्हणजे उपयोजित विज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञान हे एकमेकांस पूरक असतात. विज्ञानाचा विकास म्हणजे तंत्रज्ञानाचा विकास. विज्ञानाने शोध लावावेत, तंत्रज्ञानाने ते यंत्राद्वारे मानवजातीस उपल्बध करून द्यावे आणि त्याद्वारे मानवजातीचे कल्याण साधावे, म्हणजेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाने हातात हात घालून, एकमेकांना मदतीचा हात देऊन अखिल, अखंड मानवजातीचे कल्याण केले जाईल. या विज्ञान विषयक जागृती शालेय स्तरा पासून व्हावी व मुलांना विज्ञान विषयाची गोडी व आवड निर्माण होण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाच आयोजन दर वर्षी प्रमाणे याही वर्षी केज तालुक्यातील नामांकित इंग्लिश माध्यमाची शाळा शारदा इंग्लिश स्कूल केज येथे दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते . या विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन संस्थेचे सचिव रमेश आडसकर यांच्या हस्ते करण्यात आले.

    विविध विषया संबधी विध्यार्थ्यांनी विविध प्रकारचे प्रयोग सादर करून उपस्थित पालक शिक्षक यांचे लक्ष वेधुन घेतले .

या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. अभिजीत जाधवर , ऋषीकेशजी आडसकर शारदा इंग्लीश स्कूलच्या मार्गदर्शीका सौ अर्चनाताई आडसकर , प्राचार्य मिश्रा सर , उपप्राचार्य सुरज सनी सर , पालक , विविध विषयाचे विभाग प्रमुख , लक्ष्मी मॅम , श्रद्धा मॅम , शीतल मॅम , स्वामी मॅम ‘ सोनवने मॅम , सिबील मॅम , शोभिनी मॅम , अनुश्री मॅम , चाटे मॅम , वर्षा दिख्खत डिके सर , बाबर सर मुळे सर , वीर सर ताटे सर , शेळके सर ,मोरे सर , संग्राम मोहिते , सुरज भोजने , बालाजी’ सोळुळे ,ठोंबरे सर श्रीजीत सर आदर्श रंजन सर व इतर शिक्षक विद्यार्थी व मराठी , हिंदी , संगीत , गणित , सामाजिक शास्त्र , संगणक या विविध विषयामधील विध्यार्थ्यांनी विविध प्रकारचे प्रयोग सादर केले होते.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!