आपला बीड जिल्हाशेतकरी

केज तालुक्यातील शेतकरी झाला आता हायटेक : शेतात ड्रोनद्वारे किटक नाशकाची फवारणी

वादळवार्ता वार्तांकन – महादेव काळे

प्रगत आणि संगणकीय युगात आता शेतकरी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कमी श्रमात जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करीत आहे. केज तालुक्यात आता चक्क शेतकऱ्यांनी ड्रोनच्या साहाय्याने शेतात कीटक नाशकांची फवारणी सुरु केली आहे.

या बाबाबतची माहिती अशी की, शेतातील कामासाठी मजूर मिळणे अवघड झाले आहे. शेतकऱ्यांना शेती कामे व अंतर मशागत आणि श्रमाची कामे करण्यासाठी मजूर मिळत नाहीत. म्हणून आता केज तालुक्यातील इस्थळ येथील प्रगतिशील शेतकरी हनुमंत गोपीनाथ काळदाते व अशोक नामदेव शिंदे यांनी कृषी सहाय्यक गोविंद टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रोनद्वारे सोयाबीन पिकाची फवारणी केली आहे.या वेळी ड्रोनद्वारे सुरू असलेली सोयाबीन फवारणी पाहण्यासाठी ग्रामस्थ आणि परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

__________________________

आधुनिक तंत्रज्ञान नवनव्या साहित्याचा वापर करावा

कृषी सहाय्यक गोविंद टोपे

“शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड नियंत्रणासाठी ड्रोनद्वारे फवारणी केल्यास कमी वेळेत कमी खर्चात फवारणी फवारणी करणे शक्य होते. तसेच मनुष्यबळा पेक्षा अवघ्या अर्थ्या दरात ड्रोनने फवारणी होते.”

तसेच फवारणी करताना शेतकऱ्यांना होणारी शारिरीक ईजा, जसे विषबाधा या सारखे दुष्परिणामही टाळता येतात.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!