आपला बीड जिल्हा

सिरसाळा हद्दीत अवैद्य वाळू उपशावर पंकज कुमावत यांची कारवाई

वादळवार्ता – गौतम बचुटे

सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांनी परळी तालुक्यातील सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत डिग्रस येथील गोदावरी नदी पात्रात कारवाई करून अवैद्य वाळू उपसा व वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री आणि ट्रॅक्टर जप्त केले आहेत. या कारवाईमुळे अवैद्य वाळू उपसा करणारे धास्तावले आहेत.

या बाबतची माहिती अशी केज दि. ३ एप्रिल रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की, सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डिग्रस ता. परळी येथील गोदा पात्रातुन सुभाष नाटकर हे केणीच्या साहाय्याने बेकायदेशीर व अवैद्यरित्या वाळू उपसा करून ट्रॅक्टर मध्ये भरून अवैद्य वाहतूक करीत आहे.

माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी त्यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले. आदेश मिळताच त्यांच्या पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू वंजारे, बालाजी दराडे, सचिन अहंकारे, विकास चोपने, रामहरी भंडाने आणि अनिल मंदे यांनी दि. ४ एप्रिल रोजी मध्यरात्री १:३० वा. च्या सुमारास सदर ठिकाणी गोदावरी नदी पात्रात कारवाई केली. त्यावेळी पोलीस पथकाने वाळूने भरलेले एक ट्रॅक्टर, वाळू उपसण्यासाठी उपयोगात येणारी केनी व लोकेशनसाठी लागणारी मोटार सायकल व ट्रॅक्टर चालक यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध सिरसाळा पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली.

सदर कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!