वादळवार्ता – महादेव काळे
दि. २५ – श्रावणबाळ,संजय गांधी निराधार योजना शासनाकडून जिल्हा आणि तालुका स्तरावरून राबवण्यात येत असुन प्रामुख्याने ६५ वर्षावरील नागरिकांना आणि विधवा परित्यक्ता ,घटस्फोटीत अशा महिलांना संजयगांधी या योजनेखाली प्रतिमहा १हजार रुपये या प्रमाणे लाभ दिला जातो. परंतु केज तालुक्यातील या दोन्ही योजनेकरिता शासननिर्णया नुसार मार्च महिन्यात लाभार्थ्यांचे हयात प्रमाणपत्र मागवले जातात. त्यानुसार सदरील लाभार्थ्यांना अनुदान वितरित केले जाते. या योजनेत काही बोगस लाभार्थी असल्याचा संशय आल्याने प्रशासनाच्या वतीने मागवण्यात आलेल्या हायात प्रमाणपत्रा नुसार आणि आधारनुसार श्रावणबाळ योजनेत अनेक कमी वय असलेले लाभार्थी छाननी दरम्यान आढळून आल्याने त्यांचे सध्या वितरीत करण्यात येत असलेले अनुदान तात्पुरता स्वरूपात थांबवण्यात आले असून त्यांचेकडून ६५ पेक्षा जास्त वय असल्याचे पुयावे मागवण्यात आले असुन त्यासाठी त्यांना दोन महिन्याचा कालावधी प्रशासनाकडून देण्यात आला असल्याने अनुदानाचा बोगस लाभ घेणाऱ्यांना मात्र चांगलाच दणका बसला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की श्रावणबाळ आणि संजयगांधी निराधार हि योजना शासनाच्या वतीने राज्यात सर्वत्र राबवली जात असुन त्यासाठी अनेक निकष लावुन या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना दिला जातो. त्यात श्रावणबाळ निराधार योजनेकरिता लाभार्थ्यांचे वय आधार कार्डानुसार व डॉक्टरांच्या ६५ वर्षे वयाच्या आधारे पात्र लाभार्थ्यांना तसेच संजयगांधी निराधार योजनेसाठी विधवा, परित्यक्ता, घटस्पोटीत,अंपग, दुर्धर आजाराने ग्रस्त अशा वरील दोन्ही योजनेतील पात्र लाभार्थ्यांना प्रति महिना १ हजार रुपये एवढे मानधन जिल्हा आणि तालुका स्तरावरुन वितरीत केले जात आहे. या योजनेतील पात्र लाभार्थ्यांकडून प्रत्येक वर्षी मार्च महिन्यात लाभार्थ्यांचे हयात प्रमाणपत्र मागवून त्यानुसार वर्षभर हयात असलेल्या लाभार्थ्यांचे अनुदान वितरित केले जाते. त्यानुसार २० ऑगस्ट २०१९ च्या शासननिर्णयाच्या अधिन राहुन केजच्या तहसील कार्यालयाने श्रावणबाळ आणि संजयगांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे हयात प्रमाणपत्र, आधारकार्ड, बँकपासबुक व वयासंबधित कागदपत्र लाभार्थ्यांच्या मुलाचे आधार आणि वयासंबंधीतध प्रमाणात असे कागदपत्र मागवण्यात आले होते. हि छाननीची मोहीम दि.२३ जानेवारी २०२३ पासून केज तालुक्यातील ५३ सज्जा अंतर्रगत येणाऱ्या १२२ गावातील वरिल दोन्ही योजनेतील पात्र लाभार्थ्यांकडुन मागवण्यात आले होते. फक्त श्रावणबाळ निराधार योजनेतील सध्या लाभ घेत असलेले एकुण २५ हजार पात्र लाभार्थ्यांचे मागवलेल्या कागदपत्राची छाननी केली असता त्यापैकी ४५७ असे आढळून आले की ज्यांचे वय आजरोजी आधारकार्डा नुसार ६५ वर्षे दिसुन येत नाही. तर १३३४ असे लाभार्थी आढळून आले की ज्यांचे वय प्रत्यक्षात ६५ वर्षे दिसुनच येत नाही. त्यामुळे अशा सर्व लाभार्थ्यांची पुनर्रतपासणी करण्यात येत असुन अशा कमी वय असलेल्या सर्व लाभार्थ्यांना वैयक्तिक रित्या तहसील कार्यालया कडून वयासंबधित खालील कागदपत्रे मागवण्यात आले आहेत.
१) इयत्ता १०वी १२ वीचे गुणपत्रक २) वाहन चालक परवाना३) पासपोर्ट४)जिल्हा शल्य चिकित्सक बीड यांचे वयाचे प्रमाणात पत्र.५) जन्मतारीख किंवा वयाचे ईतर असलेले पुरावे.
हे पुरावे घेवुन तहसील कार्यालय केज या कार्यालयात जमा करावेत. त्यासाठी त्यांना २ महिधन्याचा कालावधी देण्यात आला असुन या छाणनी दरम्यान कमी वय आढळुन आलेल्या या सर्व ४५७ लाभार्थ्यांचे मागील २ महिण्याचे अनुदान सद्या थांबण्यात आले असुन ज्यांचे सबळ पुरावे या कार्यालयास प्राप्त होतील. अशा थांबवण्यात आलेल्या रकमेसह चालु अनुदान वितरीत केले जाईल.तर १३३४ लाभार्थ्यांचे अनुदान सद्या सुरु असुन वरील सर्व वयाच्या संबंधीत पुरावे दिलेल्या मुदतीत प्राप्त न झाल्यास त्यांचे अनुदान कायमस्वरूपी बंद करण्यात येणार असल्याची माहिती केज तहसीलच्या या विभागाच्या सुत्राकडुन देण्यात आली आहे.
प्रशासकीय किंवा राजकीय दबावाला न जुमानता हि धाडसी कार्यवाही केल्यामुळे आणि केज तहसीलच्या या स्तुत्य आणि कौतुकास्पद कार्यवाहीसाठी तहसीलदार या विभागाचे ना.तहसीलदार आणि त्यांची सर्व टिम यांचे कौतुक होत असुन या कार्यवाहीमुळे खऱ्या लाभार्थ्यांना न्याय मिळत असल्याने सर्वसामान्य जनतेतुन समाधान व्यक्त होत आहे. मात्र या कार्यवाहीमुळे पोटजग्या दलालाच्या पोटावर पाय पडला आहे हे मात्र खरे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!