केज नगरपंचायतच्या बेजावाबदार प्रशासनाच्या वतीने प्रत्येक वयोगटातील मजुरांच्या आरोग्याची काळजी न घेता सेफ्टी कीट न देता सर्रास वापर…..
वादळवार्ता वार्तांकन – शाहेद खतीब
केज नगरपंचायत सध्या नगरपंचायत करिता असणारे सर्व कायदे नियम मोडून काम करत असतानाचे चित्र दिसत आहे. केज शहरात एकुण सतरा वार्ड आहेत . केज शहराची लोकसंख्या तीस हजाराच्या जवळपास आहे . वस्ती मोठ्याप्रमाणात असल्यामुळे प्रत्येक नगरामध्ये नाल्यांची साफसफाई करावी लागते . मात्र जे नाल्या साफ करणारे मागासवर्गीय मजुर आहेत त्यांच्या हक्कापासुन त्यांना वंचित ठेवले जात आहे.
शासनाच्या नियमानुसार प्रत्येक नाले साफ करणाऱ्या मजुरांना ,सफाई कामगाराांना आवश्यक साहित्य म्हणजेचे सुरक्षा उपकरणे ,ऑक्सीजन मुखवटे देणे बंधनकारक आहेत हे साहित्य न देता गटारांची साफसफाई करण्याकरीता उतरविल्यास जबाबदार अधिकारी ,कंत्राटदाराविरुद्ध , एफआयआर दाखल करण्याचा नियम असताना मात्र केज नगरपंचायतचे प्रशासन बेजवाबदारपणाने सर्रास मागासवर्गीय मजुराच्या आरोग्याशी, जीवनाशी, कुंटुंबाशी खेळत आहेत त्यांच्या कडुन सेफ्टी किट न देता केज शहरातील नाले सफाई करण्याची कामे करून घेतली जात आहेत .
पाठीमागील कांहि दिवसापूर्वी केजच्या बस स्टॅन्ड बाजुस असणाऱ्या गटाराची सफाई करताना मजुराला सेफ्टी किट दिली गेली नाही त्याबरोबर आज रोजी कानडी रोड हनुमान मंदीरासमोरील गटारे साफ करणार्या मागासवर्गीय मजुरांना देखील सेफ्टी किट न देता त्यांच्याकडुन स्वच्छतेची कामे करून घेतले जात आहे .
या मजुरांना आश्या अवस्थेत पाहुन नगरपंचायत प्रशासन विकासाच्या भानगडी नगरपंचायत अधिनियम ,कायदा विसरुन मजुरांच्या आरोग्याशी , जीवनाशी , कुटुंबांशी खेळत आहेत कि काय अशीच चर्चा नागरीकामध्ये होत आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!