आपला जिल्हा

नगरपालिका निवडणूकीत ब्राह्मण समाजाला योग्य सन्मान मिळावा 

बीड वादळवार्ता – प्रतिनिधी

महाराष्ट्रात नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून नगर पंचायत , नगर परिषदा व महानगरपालीका निवडणुका मधे ब्राह्मण समाजाला सन्मान पुर्वक उमेदवाऱ्या मिळाव्यात अशी सर्व राजकीय  पक्षाना विनंती पुर्वक आवाहन करण्यात येत असल्याचे ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने करण्यात येत आहे धनंजय कुलकर्णी , दिपक रणनवरे , प्रमोद पुसरेकर , विजया अवस्थी , श्रीकांत जोशी सह आदीनी केली आहे .
महाराष्ट्रात आता सगळ्या निवडणुका होणार आहेत नगर पालीका निवडणुका बरोबरच जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागणार आहेत आता पर्यत ब्राह्मण समाजाला नेहमीच राजकीय अनास्थेचा फटका बसत आला आहे त्यामुळे यापुढे प्रत्येक निवडणुका मध्ये ब्राह्मण समाजाला योग्य सन्मान मिळालाच पाहिजे मतदार असलेल्या ब्राह्मण समाजाला निवडणूक मधे मतदानाच्या तुलनेत उमेदवारी मिळालीच पाहिजे अशी प्रत्येक राजकीय पक्षाना आवाहन  करण्यात येत आहे. ब्राह्मण समाजाला आतापर्यत सर्वच राजकीय पक्ष गृहीत धरून उमेदवारी टाळत होते तसेच ब्राह्मण समाजावर सातत्याने राजकीय टीका होत होत्या त्यामुळे ब्राह्मण समाज हा निवडणुका पासून बाजुला राहण्याचे नाराजीने काम करत होता. तसेच कोणत्याही राजकीय पक्षाने ब्राह्मण समाजावर व हिंदू धर्मावर टीका करु नये असे आग्रहाने विनंती पुर्वक समज पण देण्यात येत आहे जे राजकीय पक्ष अथवा राजकीय पक्षाचे नेते वा कार्यकर्ते जातीय धार्मिक द्वेष जाणीवपूर्वक निर्माण करतील त्यांच्या वर निवडणूक आयोगाने व राज्य सरकारने कठोर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात येत आहे असे ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!