वादळवार्ता वार्तांकन – परळी वैज्यनाथ
बीड जिल्यातील परळी येथील धर्मापुरी फाटा ते धर्मापुरी जाना-या रोडवर धारावती तांडा शिवारात बियरबार व्यवसाय भाडेतत्वार करणारे विकास हरीभाऊ बनसोडे वय ३३ वर्ष रा.भिमवाडी हे पाठीमागील तीन वर्षापासुन किशोर केद्रें यांच्या मालकीचे असणारे हॉटेल विर बियरबार भाडेतत्वावर चालवत ते त्यावरच आपल्या कुटुंबाची उपजीवीका भागवतात. त्यांच्या हॉटेल वरती तेथे काम करणारे वेटर नामे अजय बालाजी नरसे, भरत गरड असे हॉटेलवर मुक्कामी असतात. त्याच्याकडे एक पाळीव कुत्रा व दोन पाळीव कुत्र्या असे हॉटेल च्या बाहेर असतात त्यांच्या शेजारीज रहणारा रामराज कारभारी घोळवे हे बंदुक घेवुन विकास हरीभाऊ बनसोडे यांच्या हॉटेल बियरबारवर आला व त्या दोन कुत्रीपैकी एक कुत्री जिची किमंत चार हजार रुपये आहे तिचा पाठलाग करूण बंदुकिच्या गोळ्या घालुन निर्दपणे ठार मारले.
म्हणुन विकास बनसोडे त्यास विचारायास गेले असता तुझी कुत्री मला भुंकली म्हणुन मी ठार केली असे म्हणत मला भुंकल्यास मी ठार मारून टाकत असतो असे म्हणताच विकास हरीभाऊ बनसोडे यांनी परळी ग्रामीण पोलिसा ठाण्यामध्ये फिर्याद दिली असता शस्त्र प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेचे सांगण्यात येत आहे.