वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
जोला ता. केज येथील ३१ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी २:०० वा. च्या पूर्वी घडली.
जोला ता. केज येथील गणेश मारुती सारूक वय (३१ वर्ष) या तरुण शेतकऱ्याने सेवा सहकारी सोसायटीच्या कर्जबाजारीपणाला व शेतातील सततच्या नापिकीला कंटाळून मंगळवारी सकाळी शेतातील लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली.
ऐन दिवाळी सणात या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मयत गणेश सारूक यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.