वादळवार्ता – राधानगरी
कोल्हापूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या कोल्हापूर जिल्हा शिक्षक समितीच्या अधिवेशनात राधानगरीचे मधुकर मुसळे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
मधुकर मुसळे यांनी यापूर्वी राधानगरी तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष पद भूषविले असून त्यांनी अध्यक्षपदाच्या काळात वीस पटाखालील शाळा बंद करण्याच्या शासन निर्णयाविरोधात आंदोलन ,वस्ती शाळा शिक्षकांच्या नियमितीकरणासाठी सभा,आंदोलने केली .शिक्षण सेवकांच्या मानधन वाढीसाठी नागपूर अधिवेशनावरील मोर्चात सक्रिय सहभाग घेतला .जुनी पेन्शन मागणीसाठीच्या संपामध्ये अग्रभागी राहून नेतृत्व केले . विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी संप ,मोर्चा, आंदोलन,सत्याग्रह यासाठी सातत्याने पुढाकार घेतला.विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी शैक्षणिक परिषदांचे आयोजन केले.संघटनेच्या जिल्हा स्तरीय व राज्यस्तरीय अधिवेशनासाठी अधिकाधिक शिक्षकांनी उपस्थित राहावे यासाठी नियोजन केले .यापूर्वी त्यांनी जिल्हा संपर्कप्रमुख ,तसेच राज्य कार्यकारणी सदस्य या पदावर काम केले आहे .या निवडीनंतर यापुढे शिक्षकांच्या व शिक्षणाच्या प्रश्नासाठी सातत्याने संघर्ष करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले .
या निवडी प्रसंगी शिक्षक समितीचे राज्य नेते उदय शिंदे ,राज्याध्यक्ष विजय कोंबे , राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर ,शिक्षक नेते ज्योतीराम पाटील , समितीचे जिल्हाध्यक्ष अर्जुन पाटील, सरचिटणीस प्रमोद तौंदकर ,शिक्षक बँकेचे संचालक राजेंद्र पाटील ,शिक्षक बँकेचे माजी व्हाईस चेअरमन बाळासो पवार ,राधानगरीचे सरचिटणीस प्रकाश कानकेकर ,संजय चरापले,तानाजी पाटील,नारायण आयरे यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!