आपला बीड जिल्हाआपले केजसामाजीक

दैनिक वादळ वार्ता च्या बातमीचा दणका ;रात्रीतुनच जेसीबीने रस्ता बनविण्याच्या लागले कामाला…

दैनिक वादळ वार्ता/ केज

दि.५ मे रोजी दैनिक वादळ वार्तावर “‘असा एक रस्ता ; काम न करता बोगस बील उचलले ” दोनदा ” या आशयाखाली बातमी प्रकाशीत होताच रात्रीतूनच स्थानिक प्रशासनाने ३ जेसीबीने पानंद रस्ता बनविण्यास सुरुवात केली. मात्र एकाच रस्त्यावर दोनदा बिल उचलण्यामध्ये ज्या अधिकारी कर्मचारी वा प्रशासन आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार का ? का असाच गाव गाड्यांमध्ये भ्रष्टाचार फोफावत जाणार आणि त्यांना अधिकारी कर्मचारी साथ देणार हा सर्वसामान्य जनतेमध्ये पडलेला प्रश्न आहे.मुळात गाव गाड्या वरचा पानंद रस्ता हा रोजगार हमी योजने अंतर्गत गावगाड्यातील मजुरांना हाताला काम मिळावे हा उदात्त हेतू तू ठेवून प्रशासनाने, शासनाने अनेक वेळा या संदर्भात पत्रके निर्गमित केलेली आहेत. परंतु स्थानिक पातळीवर कारभार पाहणारे शासकीय आदेशाला पायदळी तुडवून हुकूमशाही माजवत आहेत यामुळे गाव गाड्याचा विकास खुंटला आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!