आपला बीड जिल्हाआपले केजक्राईम

अमोलने दिला अक्षयला अगरबत्तीच्या सुगंधा ऐवजी धूर…!

अगरबत्ती तयार करण्याची मशिनरी न देता ६ लाख रु. ची फसवणूक !

फसवणुक करणारा विरुद्ध गुन्हा दाखल

गौतम बचुटे/केज 

अगरबत्ती तयार करण्याची मशीन देतो म्हणून ६ लाख रु घेऊन सुद्धा मशिनरी न दिल्यामुळे फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबतची माहिती अशी की, लातूर जिल्ह्यातील चिखली ता अहमदपूर येथील अंकुश रामचंद्र चामे यांचा मुलगा अक्षय चामे यांच्या नावे मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रमा अंतर्गत खादी व ग्रामोद्योग मंडळाद्वारे जिल्हा उद्योग केंद्र लातुर यांचे मार्फत अगरबतीच्या उद्योगासाठी कर्ज मंजूर झाले होते. त्यासाठीचा कर्ज प्रस्ताव सेन्ट्रल बैंक ऑफ इंडीया, शाखा किनगाव, ता. अहमदपुर, जि. लातुर यांचेकडे मंजुरीसाठी पाठवला होता. अगरबत्ती उद्‌योगासाठी लागणा-या मशीनरीचे कोटेशन असल्या शिवाय कर्ज मंजुर होणार नाही असे बँकेने सांगीतले होते. दरम्यान अमोल मुळीक याचे अगरबत्ती उद्योगाचे कारखाना युट्युबवर पाहून त्याचा पत्ता काढला असता सदरचा करखाना डिघोळअंबा ता. अंबाजोगाई येथे असल्याचे समजले.

दि. २६ मार्च २०२३ या दिवसी अंकुश चामे हे डिघोळ आंबा येथे अमोल मुळीक यांच्या कारखान्यावर जावुन त्यांचा उ‌द्योग पाहीला. तसेच त्यांना अगरबत्ती बनवण्याचे मशीन खरेदी करायचे असल्याचे त्यांनी अमोल मुळीक यांना सांगीतले. त्यावेळी अमोल मुळीक याने अगरबत्ती बनवण्याचे मशीनरी पुरवण्याचे कबुल केले. तसेच त्याने कोटेशनही दिले.अगरबत्ती उ‌द्योगासाठी आवश्यक असणा-या मशीनरीचे कोटेशन चामे याना अमोल मुळीक यांनी दिल्या नंतर सदर कोटेशन सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया शाखा किनगाव, येथे जमा केले. त्या नुसार अक्षय अंकुश चामे याचे नावे किनगाव बँकेने ७ लाख रु कर्ज मंजुर केले. त्यानंतर अक्षय चामे याचे सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा किनगाव येथे त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये ७ लाख ६० हजार रु जमा केले.

सदर खाते वरुन त्या नंतर अक्षय चामे यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा किनगाव येथुन अमोल राम मुळीक रा. डिघोळअंबा याचे आयडीबीआय बँक शाखा अंबाजोगाई खात्यावर दि. १५ जून २०२३ रोजी आरटीजीएसद्वारे ६ लाख रु. वर्ग केले. अमोल मुळीक यांना दि. २६ मार्च २०२३ रोजी दुपारी १:०० वा सुमारास समक्ष भेटून ठरलेली रक्कम ६ लाख रु. खात्यावर जमा केले बाबत सांगीतले. त्या नंतर अमोल उद्योगचे मालक अमोल मुळीक यांनी अगरबती उ‌द्योगासाठी अवश्यक असणाऱ्या मशीनरी २० दिवसाच्या आत पुरवतो. असे सांगीतले. २० दिवस उलटुन गेल्या नंतर मशीनरी पुरवण्याच्या बाबत अमोल मुळीक यांना वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता अमोल मुळीक याने संपर्क करण्याचे टाळले.दरम्यान अक्षय मुळीक याने ६ लाख रु घेऊनही अगरबत्ती उद्योगासाठी लागणारी मशिनरी न दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच अंकुश चामे यांच्या फिर्यादी वरून दि. ११ मार्च रोजी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून अक्षय मुळीक याच्या विरुद्ध गु र नं ५८/२०२४ भा दं वि ४२० नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्र शेंडगे हे तपास करीत आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!