आपला बीड जिल्हा

केज बीड रोडवर मोटार सायकलला पिकअपची धडक : दोघे गंभीर जखमी

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

केज बीड रस्त्यावर एका मोटार सायकलीला भरधाव वेगातील पिकअपने जोराची धडक दिली त्यात मोटार सायकलवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

या बाबतची माहिती अशी की, शनिवार दि. ३ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११:०० वा केज बीड महामार्ग क्र. ५४८-डी डोनगाव फाटा, पद्मश्री विठ्ठलराव पाटील साखर कारखान्या जवळील अर्णव स्नॅक्स सेंटर जवळ मोटार सायकल क्र. (एम एच ४४/आर ९१२४) ला केज कडून बीडच्या दिशेने जात असलेल्या पिकअप क्र (एम एच २४/ए यु ५६७०) या भरधाव वाहनाने जोराची धडक दिली यात मोटार सायकलवरील दोघे गंभीर जखमी झाले असून रुग्णवाहिका चालक मकरंद घुले यांनी तात्काळ घटनास्थळी हजर होत जखमींना उपजिल्हा रुग्णालय केज येथे प्रथमोपचार करण्यासाठी दाखल केले दरम्यान अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशाने सरकारी वाहनाने पोलिस उपनिरीक्षक कादरी, त्रिंबक सोपने, शेख पाशा आणि दिलीप गित्ते व गृह रक्षक दलाचे जवान शिवदास आवाड हे अपघातस्थळी हजर होत कारवाई केली.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!