आपला बीड जिल्हा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीस दहा वर्षाची सक्त मजूरी आणि दंडाची शिक्षा

फिर्यादी व साक्षीदार फितूर होऊनही जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

एका अल्पवयीन मुलीवर लैंगक अत्याचार करून तिचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी दिलेल्या प्रकरणी फिर्यादी आणि साक्षीदार फितूर झाले तरी देखील सबळ पुराव्या आधारे जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एच एस महाजन यांनी नराधम आरोपीस दहा वर्षे सक्त मजुरी व वीस हजार रु. दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

या बाबतची माहिती अशी की, या प्रकरणाची माहीती अशी की , दि. १९ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ९:०० वा. पिडीत अल्पवयीन मुलगी ही तिचे राहते घराचे पाठीमागे माळावर शेतातील ओढ्या मधुन परत येत होती. त्या वेळी आरोपी नामे विशाल शरद शेळके याने तिच्या हाताला धरून जबरदस्तीने लैगिक अत्याचार केला आणि तिचे अश्लिल फोटो काढले. तसेच आरोपीने तिला चापटा बुक्याने मारहाण करून तीला पुन्हा त्याच ठिकाणी भेटण्यासाठी बोलवविले. आणि जर ती त्याला भेटण्यासाठी आली नाही; तर जिवे मारून टाकीन आणि मोबाईल मधले फोटो सोशल मिडियावर टाकीन. अशी धमकी दिली. परंतु दुसऱ्या दिवशी पिडीत मुलगी आरोपीला भेटण्यासाठी गेली नाही. म्हणुन आरोपीने पिडीत मुलीची अश्लिल फोटो त्याचे मोबाईल व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवुन व्हायरल केले होते. पिडित मुलीच्या फिर्यादी वरून पोलीस स्टेशन नेकनुर येथे आरोपी विरूध्द भा दं वि. ३७६ (३), ३२३, ५०६ आणि बालकांचे लैंगीक अपराधांपासुन संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ३ व ४ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६७ (ब) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला होता.

त्या फिर्यादी वरुन तपासी अधिकारी तथा तात्कालीन केज पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन आणि त्यांचे लेखनिक अशोक नामदास यांनी या प्रकरणाचा तपास करून मा. जिल्हा व सत्र न्यायालय, बीड येथे दोषारोप पत्र दाखल केले होते. त्या प्रकरणाची सुनावनी मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांच्या न्यायालयात झाली. आरोपी विरूध्द गुन्हा सिध्द करण्यासाठी सरकारी पक्षा तर्फे एकुण आठ साक्षीदार तपासण्यात आले. कोर्टातर्फे एक साक्षीदार तपासण्यात आला.

सदर प्रकरणात फिर्यादी व इतर साक्षीदार फितुर झाले होते; परंतु सदर प्रकरणात सरकार पक्षाचे दाखल केलेले सक्षम पुराव्याचे व कागदोपत्रांचे अवलोकन करुन व सहायक सरकारी वकील मंजुषा दराडे यांचा युक्तीवाद ग्राहय धरुन मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी आरोपी विशाल शरद शेळके यास कलम ३ , ४ ( १ ) पोक्सो कायदयान्वये दोषी धरून दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व वीस हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

सदर प्रकरणात सहाय्यक सरकारी वकिल मंजुषा दराडे यांनी काम पाहिले. व त्यांना सहाय्यक सरकारी वकिल बी. एस. राख यांनी सहकार्य केले. तसेच त्यांना पैरवी अधिकारी सहाय्यक फौजदार इंगळे, पोलीस उपनिरीक्षक जायभाये, पोलिस हेडकॉन्स्टेबल सानप व इंगोले व महिला पोलिस नाईक सी. एस. नगारगोजे यांनी सहकार्य केले.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!