आंदोलन
मराठा आरक्षणासाठी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणूकिवर ग्रामस्थांनी टाकला बहिष्कार.
“आरक्षण मिळेपर्यंत सोनिजवळा सेवा सहकारी सोयायटी निवडणूकीवर मराठा बांधवांनी बहिष्कार टाकून दिला मनोज जरांगे पाटिल यांच्या आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा
वादळवार्ता/केज
केज तालुक्यातील सोनिजवळा येथील सेवा सहकारी सोसायटी च्या निवडणूक वर ग्रामस्थांनी टाकला बहिष्कार.
या बाबत सविस्तर आसे की केज तालुक्यातील सोनिजवळा येथील सेवा सहकारी सोसायटी च्या निवडणूकीवर सोनिजवळा ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला आहे. तालुक्यातील सोनिजवळा येथील सेवा सहकारी सोसायटी चा निवडणुक कार्यक्रम जाहीर झालेला आहे तरी येत्या 20 जानेवारी रोजी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मा मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र राज्यात जो लढा उभा केलेला आहे त्या अनुषंगाने 20 जानेवारी रोजी मा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील लोकशाही मार्गाने अंतरवलीसराटी ते मुंबई आसा पाई मोर्चा निघणार आहे त्यामध्ये मौजे सोनिजवळा येथील सेवा सहकारी सोसायटीचे सभासद बांधव व भगीनी व इतर नागरीक हे मोर्चा मध्ये सहभागी होणार असुन अशा परिस्थितीत सेवा सहकारी सोसायटी ची निवडणूक घेणे योग्य नाही . पण बाळासाहेबची शिवसेना (शिंदे गट) यांनी मात्रा बार उमेदवारी अर्ज दाखल केले आहे मराठा बांधवांनी आसे जाहीर केले होते की जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सेवा सहकारी सोसायटी ची निवडणूक घेण्यात येऊ नये पण एका गटाने उमेदवार अर्ज दाखल केल्यामुळे काय होणार आशी नागरीक चर्चा करत आहेत तरी कांही मराठा बांधवांनी केज तहसीलदार व साहाय्यक निबंधक कार्यालय केज यांना निवेदन देऊन विनंती केली आहे .
सोनिजवळा येथील ग्रामस्थांनी सेवा सहकारी सोसायटी च्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला व त्याला बजरंग सोनवणे गट व रमेशराव आडसकर गट यांनी जाहीर पाठिंबा दिला पण बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) यांनी मात्रा बारा उमेदवारी अर्ज दाखल केले त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आवाहनाल दुजोरा देऊन उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सोनिजवळा येथील मराठा समाज बांधवांच्या भावना तीव्र झाल्याचे जनतेत चर्चा आहे .