असंख्य पदाधिकारी , कार्यकर्त्याच्या उपस्थित जिल्हा बैठकीत संपन्न
वादळवार्ता – केज
शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी बीड पुर्व विभाग करिता शिवसेना जिल्हाप्रमुख या पदासाठी रत्नाकर शिंदे यांची नियुक्ती केल्यानंतर प्रथमच आज बीड जिल्हा शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक केज येथे तिरुपती मंगल कार्यालयात शिवसेना नेते सचिव खासदार विनायक राऊत साहेब,माननीय अनिल देसाई साहेब,शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे,समन्वयक विश्वनाथ नेरूरकर साहेब, मराठवाडा संपर्क नेते खा. चंद्रकांत खैरे साहेब, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब,मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन साहेब,यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा संपर्क प्रमुख माजी आमदार सुनील दादा धांडे सर,सह संपर्क प्रमुख बाळासाहेब अंबुरे यांच्या उपस्थितीत नवनियुक्त जिल्हा प्रमुख रत्नाकर आप्पा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महिला आघाडी जिल्हा प्रमुख राज्य आयोग सदस्य संगिता ताई चव्हाण, युवा सेना जिल्हाप्रमुख शुभम डाके, डॉ नयनाताई सिरसाठ,परळी विधानसभा संपर्कप्रमुख आशुतोष मार्तंड,यांच्या उपस्थितीत जल्लोषात संपन्न झाली.
यावेळी जिल्हाप्रमुख रत्नाकर आप्पा शिंदे यांनी येणाऱ्या काळात माजलगाव -वडवणी-धारुर-केज अंबाजोगाई परळी तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची त्सुनामी भगवी लाट निर्माण करणार असल्याचे शिवसैनिकांना आवाहन केले .
तसेच पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी जो विश्वास दाखवला आहे, शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे जिल्ह्यात पक्ष बळकटी करिता परिश्रम घेत आहेत म्हणून माझ्यावर मोठी जबाबदारी आहे .प्रचंड काम करून पक्ष बळकटी करिता अहोरात्र मेहनत घेऊन पक्ष प्रमुखांनी टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवेल असे अभिवचन दिले,यावेळी लोकसभा संपर्कप्रमुख सुनील दादा धांडे यांनी शिवसैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार असे आवाहन केले. 
सदरिल बैठकीला जिल्हा सचिव अतुल उगले, जिल्हासंघटक राजेभाऊ लोमटे,दासुपाटील बादाडे, उपजिल्हाप्रमुख रामराजे सोळंके,रामदास ढगे, शिवाजी दादा कुलकर्णी, पपु ठक्कर,दिपक मोराळे, तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे,नागेश शिनगारे,मदन परदेशी, प्रभाकर धरपडे, वडवणी माजी तालुका प्रमुख विनायक मुळे, विधानसभा प्रमुख अशोक जाधव ,नामदेव सोजे ,राजाभैय्या पांडे, शहर प्रमुख तात्या रोडे, राजेश विभुते ,बाबा सराफ, गजानन मुडेगावकर, दत्ता राजवंन, अभिमान पटाईत, महाराना घोळवे, अशोक आळणे ,महेश थेटे, अरविंद थोरात,युवराज शिंदे, बालासाहेब शेप, विशाल घोबाळे ,नवनाथ पवार ,भोजराज पालीवाल ,सूधिर जाधव , अमोल चौधरी, नगरसेवक नागेश डिगे , रमेश चौडे , किशोर घुले ,श्रीधर गरड, श्याम धांडे
तर महिला आघाडीच्या सहसंपर्कप्रमुख विदयाताई गुजर, उपजिल्हाप्रमुख मनोरमा ताई डोईफोडे, फरजानाबाजी शेख , पिंपरे ताई ,अश्विनी बडे , रेखाताई घोबाळे , यमुना साखरे ,लक्ष्मीताई सरवदे, सह जिल्ह्यातील सोनू गुट्टे सह जिल्ह्यातील शिवसेना महिला आघाडी युवासेना उपतालुकाप्रमुख ,विभागप्रमुख, सर्कल प्रमुख, आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!