केज । प्रतिनिधी
केज येथे बसडेपो मंजूर करा व इलेक्ट्रिक बसगाड्या चार्जिंग सेंटर सुरू करा या मागणीसाठी केज विकास संघर्ष समितीच्या वतीने मंगळवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. केज येथे बसडेपो मंजुरीसाठी समिती गेली वीस वर्षे विविध आंदोलनाच्या रूपाने पाठपुरावा करत आहे. केज हे तालुक्याचे ठिकाण आता दोन प्रमुख महामार्गाच्या जोडणीवर आल्याने येथून दररोज हजारो प्रवासी येथून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बसगाड्यांनी प्रवास करत असतात. त्यामुळे येथे बसडेपो झाल्यास येथून आवश्यक त्या लांब पल्याच्या व स्थानिक परिसरात प्रवाशांच्या गरजेनुसार आवश्यक गाड्यांचे व्यवस्थापन करणे शक्य होणार आहे. यासाठी केज शहरात बीड रोड लगत राज्यपरिवहन मंडळाची सात एक्करहून अधिक जागा आरक्षित जागा सध्या पडून आहे. या जागेवर बसडेपो झाल्यास केजच्या विकासात भर पडणार आहे.
आजच्या लाक्षणिक उपोषणास केज तहासिलचे तहसीलदार राकेश गिड्डे आणि किल्लेधारूर आगार प्रमुख श्री चौरे यांनी भेट देऊन याबाबत सकारात्मक अहवाल पाठवून सतत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. या लाक्षणिक उपोषणात समितीचे समन्वयक हनुमंत भोसले, शेषराव घोरपडे, श्रीमती इंदूबाई घोरपडे, भाग्यश्री पैठणकर, नासेर मुंडे, महेश जाजू, प्रवीण देशपांडे, विकास मिरगणे, इंजिनिअर मोहनराव कराड, रामहरी कोल्हे, ऑनकॅप्टन अनिल सपाटे, आदेश देशमुख, पत्रकार संतोष गालफाडे, पत्रकार श्रावणकुमार जाधव, पत्रकार मुब्बस्सीर खतीब, राहुल खोडसे, रोहित कसबे, गोपीनाथ इनकर यांच्यासह नागरिकांनी सहभाग नोंदवला.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!