बेशिस्त वाहन धारकांना शिस्त लावण्यासाठी केज पोलीस ॲक्शन मोड मध्ये : ५० वाहनावर कारवाई
वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
केज शहारामध्ये विना नंबर, ट्रिपल सीट आणि रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनावर सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी कारवाया केल्या.
केज शहरात गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर प्रमुख मार्गावरून पोलीसांचे पथ संचलन सुरू असताना सहाय्यक पोलीसअधीक्षक पंकज कुमावत यांना शहरातील मुख्य ररस्त्यावर अस्ताव्यस्त पद्धतीने वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग, पोलीस उपनिरीक्षक कादरी आणि वाहतूक शाखा यांना नो-पार्किंग, ट्रिपल सीट आणि विना नंबरच्या वाहनावर कार्यवाही करण्याचे आदेश देताच पोलिसांनी आशा सुमारे ५० वाहनावर कारवाया केल्या.
दरम्यान सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी स्वतः रस्त्यावर उतरून वाहतुकीला शिस्त लावून वाहतूक सुरळीत होण्यासाठी केलेल्या कारवाईचे कौतुक होत असून बेशीस्त वाहनचालक मात्र धास्तावले आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!