आपला बीड जिल्हाआपले केजक्राईम

भरगाव वेगाने येऊन कारने दिली मोटरसायकलला जोराची धडक ; कारचालकाचे पलायन

वादळवार्ता – गौतम बचुटे

तालुक्यातील साळेगाव येथे गालफाडे यांच्या शेता जवळ मोटार सायकलला भरधाव वेगातील कारने समोरून धडक दिल्याने मोटार सायकलस्वार गंभीर जखमी झाला आहे. अपघात झाल्या नंतर केज च्या दिशेने पळून गेला.

या बाबतची माहिती अशी की दि. १६ एप्रिल रोजी दुपारी ४:१५ वा. च्या सुमारास कळंबकडून केजकडे जात असलेल्या भरधाव कारने समोरून येणाऱ्या मोटार सायकलीला क्र. (एम एच-२३/के-५३००) साळेगांव येथे गालफाडे यांच्या शेता जवळ धडक दिली. या अपघातात मोटार सायकलस्वार नंदकुमार जोगदंड, रा. भाटुंबा ता. केज हा गंभीर जखमी झाला आहे. कार चालकाने मात्र अपघात स्थळावरून पळ काढला.

या अपघाताची माहिती अरुण झाडबुके आणि जय जोगदंड यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या आदेशा वरून पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे हे त्या कारचा शोध घेत आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!