वादळवार्ता – केज
केज तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती – २०२३ निवडणूक संदर्भात आज पवनसूत निवास केज येथे प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॅांग्रेस पक्षाची बैठक संपन्न झाली. यावेळी केज तालुक्यातील बहूसंख्य ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, सोसायटीचे चेअरमन, संचालक , पंचायत समिती सदस्य व रा कॅां पक्षाचे पदाधिकारी उत्स्फुर्तपणे उपस्थित होते. याप्रसंगी झालेल्या चर्चेत उपस्थितांनी निवडणूक निर्णय प्रक्रियेचे सर्व अधिकार बजरंग सोनवणे यांना देण्यात येत आहेत असा ठराव सर्वानुमते मंजूर केला व निवडणूक लढवावीच असे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे म्हणून मी कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कम उभा आहे. कार्यकर्त्यांसाठी लढणारा बजरंग सोनवणे आहे, कार्यकर्त्यांच्या निवडणूकीत पळून जाणारा मी नाही. मा.धनंजय मुंडे साहेब व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाचे पालन करुन आपण या निवडणूकीची आगामी रणनिती ठरवू, असे मत यावेळी राष्ट्रवादीचे नेते शेतकरी पुत्र तथा येडेश्वरी कारखान्याचे चेअरमन बजरंग बप्पा सोनवणे यांनी व्यक्त केले.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!