वादळवार्ता – केज
केज तालुक्यातील मौजे टाकळी ग्रामपंचायत अंतर्गत पाणलोट क्षेत्रामध्ये सचिव म्हणुन कामं करणारे महादेव त्रिंबक घुले यांनी केजचे तहसिलदार यांना दिला निवेदनाव्दारे इशारा.
या बाबत माहिती अशी कि केज तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायत अंतर्गत पाणलोट क्षेत्रामध्ये सचिव पदावर २०१२ पासुन एकुण ५ वर्षासाठी कार्यरत असणारे महादेव त्रिंबक घुले यांचे मानधन मागील दहा वर्षापासुन रखडलेले आहे . त्यांना एका महिन्याला ३ हजार रुपये प्रमाणे मानधन होते. २०१२ ते २०१७ या पाच वर्षातील एकुण मानधन १ लक्ष ८० हजार रुपये थकलेले आहे. त्यांचे मानधन मिळावे या करिता कृषी कार्यालया मध्ये अनेक खेटे मारून सुद्धा त्यांचे मानधन मिळाले नाही . म्हणुन कृषी विभागाचे अधिकारी तथा प्रशासनास वैतागुन अंदोलनाचे शस्त्र हाती घेत आठ दिवसात मानधन द्यावे अन्यथा मी दि २२ ऑगस्ट रोजी केज तहसिल कार्यालया समोर अमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदन तहसिल कार्यालय केज येथे देण्यात आले आहे.
या निवेदनाच्या प्रती ,मा. तालुका कृषी अधिकारी साहेब केज ,मा. पोलीस निरीक्षक साहेब पोलीस ठाणे केज ,मा. जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय बीड , व मा. वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा पुणे यांना देण्यात आल्या आहेत .
सदरील निवेदनावर महादेव त्रिंबक घुले यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे सचिवाच्या निवेदनाची प्रशासन दखल घेईल कि नाही का आमरण उपोषणास बसावे लागणार ? याकडे टाकळी गावाचे लक्ष लागले आहे .
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!