चिंचोली माळी येथील संत शिरोमणी सावता पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचा समारोप
वादळवार्ता वार्तांकन – महादेव काळे
काळेचुराचुराकर माखन खाया । गौळणीका नंद कुमार कन्हया ॥१ ॥ काहे बराई दिखावत मोहि । जाणत हुं प्रभुपणा ते राखो भाई ॥ध्रु .॥ और बात सुन उखलसुं गला । बांधलिया तूं आपना गोपाला ॥३ ॥ फिरत बनबन गाऊ धरावत कहे तुकयाबंधु लकरी लेले हात ॥४ ॥
या अभंगावर कृष्ण चरित्रावर विवेचन करताना सांगितले की धर्म, जाती, प्रांत, भाषा याच्यातुन निर्माण होणारा द्वेष तो द्वेष समाप्त करण्याचे काम कृष्णाने केले. याप्रकारे मोलाचे मार्गदर्शन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. आत्माराम शास्त्री यांनी काल्याच्या किर्तनात भाविक भक्तांना श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी चिंचोली माळी येथील संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमीत्त मेजर राम प्रभु राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ह.भ.प. संगित विशारद सुमंत महाराज डाके, ह.भ.प. वैभव महाराज डाके, मृदंगाचार्य ह.भ.प. विलास महाराज कोरडे, आबा महाराज मेहरकर, संजय महाराज नखाते यांच्या सुमधुर गायनातुन व वादनाने तसेच गावातील युवकांच्या अविरत परिश्रमाने अखंड हरिनाम सप्ताह व श्री संत शिरोमणी सावता महाराज जीवन चरित्र कथावाचन भव्यदिव्य सोहळा संपन्न झाला. आयोजित सात दिवसाच्या अखंड हरीनाम सप्ताहाचा समारोप ह.भ.प. आत्माराम शास्त्री निजबोध आश्रम लिंबारुई देवी, बीड यांच्या काल्याच्या किर्तनाने समारोप मोठ्या उत्साहात झाला.
यावेळी ह.भ.प. महंत भगवान महाराज पुरी, ह.भ.प. केशव महाराज शास्त्री,भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष सुनील आबा गलांडे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष अॅड. सुभाष राऊत, भाजपा युवा आघाडीचे नेते विष्णू भाऊ घुले, आपला परिवार वृध्दाश्रमाच्या संचालीका मनिषाताई पवार, प. स. सदस्य नारायण शिंदे, शिवसेनेचे संजय शिंदे, ग्रामपंचायत सदस्य अभिजित राऊत, बाळासाहेब राऊत, व मित्र परिवार यांच्यासह गावातील व परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी गावातील धडाडीचे मेजर राम प्रभु राऊत, व तरुण मंडळी यांनी अहोरात्र परिश्रम घेतले.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!