लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा फोटो केज तालुका भाजपा अध्यक्ष यांच्या बॅनरवरुन गायब
वादळवार्ता – केज
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव मा.पंकजा ताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त केज तालुका अध्यक्ष यांनी केज शहरात विविध ठिकाणी मोठ मोठे बँनर लावले परंतू त्या बँनर वर ज्याच्या सावलीत मोठे झाले, मोठमोठ्या पदावर ज्यांच्या कृपाशिर्वादाने विराजमान झाले, समाजात मानाचे स्थान मिळाले मात्र बँनरवर स्वर्गीय लोकनेते मा.गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा फोटो लावण्यासाठी भाजपाचे केज तालुका अध्यक्षांना विसर पडलेला दिसून येत आहे. मा.पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बँनवर स्व.गोपिनाथरावजी मुंडे साहेब यांच्या फोटोचे केज तालुका भाजप अध्यक्ष यांना वावडे का ? स्वर्गीय मुंडे साहेबांचा फोटो बॅनरवर लावण्याची अध्यक्ष महोदयांना ॲलर्जी का? ताई तुमचे केज भाजपा अध्यक्ष एवढे मोठे झाले काय ? आदि प्रश्न स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या विचारांवर चालणाऱ्या तथा माननाऱ्या व सामाजीक कार्य करणाऱ्याना पडले आहेत ? ज्या स्वर्गीय मुंडे साहेबांनी भाजप वाढवण्यासाठी जिवाचे रान केले, आतोनात कष्ट सोसले आशा लोकनेत्यांना मुंडे साहेबांना महाराष्ट्रतच नव्हे तर संपूर्ण देशात साहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे. असे असताना विसर पडने म्हणजे ? सध्या केज शहरात याच बॅनरबाजीची चर्चा जोराची चालू आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!