आपला बीड जिल्हाआपले केजक्राईम

कुऱ्हाडीचा घाव घालून बायकोचा खून : आरोपीला तीन दिवसाची पोलीस कोठडी

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

केज तालुक्यात थरारक घटना घडली असून नवऱ्याने बायकोच्या गळा आणि छातीवर धारदार कुऱ्हाडीचे वार करून तिचा जागीच खून केला होता त्यातील आरोपी पतीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

केज तालुक्यातील ढाकेफळ येथील चौसा वस्ती नावाने ओळखल्या जात असलेल्या वस्तीवर मंगळवार रोजी दि. ७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३:२० भगवान शाहूंराव थोरात वय ( ३३ वर्ष) याने त्याची पत्नी सौ. आरती भगवान थोरात वय (२७ वर्ष) याने धारदार कुऱ्हाडीने गळा आणि छातीवर जोराचा वार करून तिचा खून केला. ही घटना घडली त्यावेळी भगवान याचे आई-वडील हे एका कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेलेले होते. दुपारी ३:०० च्या दरम्यान त्याने जवळ कोणी नसताना घराच्या बाहेर दरवाजा जवळ कुऱ्हाडीने सौ आरती हिचा खून केला. दुपारची वेळ असल्याने आजूबाजूला कोणीच नव्हते. खून केल्या नंतर त्याने कुऱ्हाड प्रेताजवळच टाकून तो स्वतः युसुफवडगाव पोलीस ठाण्यात हजर झाला आणि अधिकाऱ्यांना त्याने पत्नीचा खून केल्याची माहिती दिली.

या प्रकरणी मयत आरती थोरात हिचा भाऊ अजय अशोक पवार यांच्या फिर्यादि वरून भगवान हा प्लॉट घेण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये म्हणून कुऱ्हाडीने खून केला अशी तक्रार दिली. त्यावरून आरोपी भगवान थोरात याच्या विरुद्ध गुंर नं २४/२०२३ भा दं वि ३०२ नुसार युसुफवडगाव वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे हे पुढील तपास करीत आहेत. आरोपीला पोलिसांनी न्यायालया समोर हजर केले असता दि. १० फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!