कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, अधिकार्यांची उपस्थिती
वादळवार्ता वार्तांकन – महादेव काळे
केज येथील पंचायत समिती कार्यालयाकडून ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ उपक्रम अंतर्गत हर घर तिरंगा’ अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे.
याअनुषंगाने तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचांना दि.८ ऑगस्ट सोमवार रोजी राष्ट्रध्वजासह प्रचार-प्रसिध्दीचे बॅनर वितरण करण्यात आले आहे. यावेळी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, अधिकार्यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमास भाजप नेते नंदकिशोर मुंदडा, माजी अमदार पृथ्वीराज साठे, गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे, सहायक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, माजी सभापती विष्णू घुले, माजी जि.प.सदस्य किसन कदम, भाजपा तालुकाध्यक्ष भगवानराव केदार, शिवसंग्रामचे युवक जिल्हाध्यक्ष रामहरी मेटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोराळे, महिला आघाडी तालुकाध्यक्षा संजिवनी देशमुख, माजी पं.स.सदस्य प्रेमचंद कोकाटे, उमाकांत भुसारी, शिंदे, डॉ.वासुदेव नेहेरकर, सरपंच विष्णू चाटे, संजय महाराज केदार, सहाय्यक गटविकास अधिकारी शेप, महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी लटपटे, उप अभियंता साळुंके, कनिष्ठ प्रशासन अधिकारी ढोकर, विस्तार अधिकारी अनिल चौरे, सखाराम काशिद, ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष धनराज सोनवणे, सचिव ओम चोपणे, उपाध्यक्ष शिवाजी पटाईत, अनिता जाधव यांच्यासह सर्व पदाधिकारी, सर्व सरपंच, ग्रामसेवक, पंचायत समितीचे सर्व कर्मचारी यांच्या सह ग्रामीण भागातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर शेळके, यांनी केले तर आभार ग्रामसेवक प्रविण तेलप यांनी मानले.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!