आंदोलनआपला बीड जिल्हाआपले केज

केज येथे मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने कुचकामी पत्रकार संरक्षण कायद्याची होळी”

पत्रकार संरक्षण कायदा अधिक कठोर करावा – विजय आरकडे

वादळवार्ता – केज

महाराष्ट्र शासनाने राज्यात 8 नोव्हेंबर 2019 पासून पत्रकार संरक्षण कायदा लागू केला आहे. हा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे. महाराष्ट्राचा हा कायदा पुरेसा सक्षम आणि चांगला असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने तो आता कुचकामी ठरला आहे. राज्यात गेल्या चार वर्षात जवळपास 200 पत्रकारांवर हल्ले झाले किंवा त्यांना, धमक्या, शिविगाळ केली गेली, मात्र केवळ 37 प्रकरणातच पत्रकार संरक्षण कायदा लागू केल्याने आणि त्यातील एकाही प्रकरणात आरोपीला शिक्षा न झाल्याने या कायद्याची उपयुक्तता संपली असून कायदयाची भितीच समाजकंटकांचा मनात उरली नाही.. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा चिंता वाटावी एवढ्या मोठ्या संख्येनं पत्रकारांवरील हल्ले वाढले आहेत.. अलिकडेच पाचोरा येथील एका पत्रकारास आमदार किशोर पाटील यांनी अगोदर शिविगाळ केली आणि दुसऱ्या दिवशी आपल्या गुंडाकरवी त्यांच्यावर हल्ला चढविला.. हे चित्र उभ्या महाराष्ट्राने पाहिले,असे असले तरी मारहाण करणाऱ्या गुंडांवर किंवा शिविगाळ आणि धमक्या देणाऱ्या आमदार किशोर पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल झालेला नाही.पत्रकारांवर जे हल्ले होतात त्यातील 75 टक्क्यावर हल्ले हे राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होतात हे वास्तव आकडेवारीसह समोर आलेलं आहे.मग अशा प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होतात आणि पोलीस पत्रकार संरक्षण कायद्याचं कलम न लावता साधी एनसी दाखल करून हा विषय बंद करून टाकतात असे प्रकार वारंवार आणि सर्वत्र दिसून येत आहेत.हे थांबलं पाहिजे, आणि पत्रकारांना निर्भय वातावरणात काम करता आलं पाहिजे अशी आमची विनंती आहे.

सरकारकडे आमच्या प्रामुख्यानं दोन मागण्या आहेत, पत्रकारावर हल्ला झाल्यानंतर पोलीस पत्रकार संरक्षण कायद्याचं कलम लावायला टाळाटाळ करीत असतील तर संबंधीत अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी, जेणे करून अंमलबजावणीतील मुख्य अडसर दूर होईल..

दुसरी मागणी अशी आहे की, पत्रकारांवरील हल्लाचे सर्व खटले जलदगती न्यायालयामार्फत चालविण्यात यावेत.जेणे करून पत्रकारांना न्याय मिळू शकेल.

पत्रकारांवरील वाढते हल्ले, पत्रकार संरक्षण कायदयाची अंमलबजावणी करण्यास होत असलेली टाळाटाळ आणि आमदार किशोर पाटील यांच्या अरेरावीचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने सर्व पत्रकार यांनी गुरूवारी राज्यभर निदर्शने करून पत्रकार संरक्षण कायदयाची होळी केली आहे महाराष्ट्रातील सर्व तालुक्यात हे आंदोलन होत आहे.कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पत्रकारांना रस्त्यावर उतरण्याची वेळ यावी हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. यावेळी केज येथील शिवाजी चौक येथे मोठ्या प्रमाणात तालुक्यातील पत्रकार बांधव एकत्र झाले होते, सर्वांनी मिळून पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करून समस्त पत्रकार बांधवांच्या मागण्याचे निवेदन, तहसीलदार व केज पोलिस स्टेशनला देण्यात आले यावेळी जेष्ठ पत्रकार दिलिप सपाटे, मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष गौतम बचुटे , रामदास तपसे मराठी पत्रकार परिषदेचे विजय आरकडे पत्रकार ,अजय भांगे यांनी मनोगतात पत्रकार सरंक्षण कायदा कुचकामी न ठेवता पत्रकारावरील अन्याय दुर होण्यासाठी अधिक कठोर करावा असे म्हटले यावेळी धनंजय कुलकर्णी, सतीश केजकर,विनोद शिंदे, अभय कुलकर्णी , अशोक सोनवणे , रमेश गुळभिले ,दशरथ चवरे, नंदकुमार मोरे, रमेश इतापे, रामदास तपसे, महादेव दळवे, दत्तात्रय हाडिंबाग ,महादेव गायकवाड, दत्ता मुजमुले, प्रकाश मुंडे, साजेद इनामदार , श्रावण कुमार जाधव , मधुकर सिरसट , सुहास छिद्रवार , सनी शेख , महादेव काळे , बालासाहेब जाधव , मुबाशीर खतीब , इनामदार अजीमोदीन ,आदिच्या निवेदनणावर स्वाक्षऱ्या आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!