वादळवार्ता वार्तांकन – शाहेद खतीब
केज – बीड रस्ता झाला अपघाती रस्ता
केज – बीड रस्त्यावर केज पासून अकरा किमी अंतरावर असलेल्या केज बीड रोडवरील मस्साजोग जवळ अपघात झाला असून यामध्ये मोटारसायकल वरील एकाचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
सदरील घटना शुक्रवारी दिनांक २२ जुलै रोजी रात्री ८-०० वाजण्याच्या दरम्यान घडली.लक्ष्मण ओव्हाळ व यशोधरा लक्ष्मण ओव्हाळ रा. क्रांतीनगर पाटोदा अशी जखमींची नावे आहेत.
सदरील अपघात झाल्यानंतर त्यांना एका खाजगी वाहनाने त्यांना केजच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात येत होते.
परंतु कोरेगाव पासून त्यांना रुग्णवाहिकेत दवाखान्यात घेऊन आले. मात्र तपासणीअंती लक्ष्मण ओव्हाळ यांना मृत घोषित केले. तर जखमी महिलेला पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
सदरील अपघात नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसून घटनास्थळी केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष मिसळे यांच्यासह पोलीस कर्मचारी शेख पाशा,श्री. आघाव यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!