वादळवार्ता वार्तांकन – परळी
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी रक्तपेटी रूमला अचानक आग लागल्याने सगळ्यांचीच धांदल उडाली असुन अचानक धूर येत असल्याने बाजूच्या वार्ड मधील रुग्णांना दुसऱ्या वार्डमध्ये हलवण्यात आले आहे मात्र रक्तपिशवी ज्या कुलिंग फ्रिजमध्ये ठेवली जाते त्याला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने ही घटना घडल्याचा प्राथमिक माहिती समोर येते आहे.
परळीतील उपजिल्हा रुग्णालय येथे रक्तपेढी रूमला अचानक आग लागली मात्र कोणाला कळण्याच्या आधीच आगीने भयंकर स्वरूप घेतलं आणि त्या आगे मधून निघणारा जो धूर होता त्या धुराचा सगळा लोट बाजूच्या वार्डमध्ये जात असल्याने तेथील सर्व रुग्नाना इतर वार्डमध्ये शिफ्ट करण्यात आले .
मात्र प्राथमिक स्वरूपात लागलेली ही आग विझवण्यासाठी देखील रुग्णालयात कोणतेही साहित्य उपलब्ध नसल्याचे आढळून आले . त्यानंतर अग्निशामक दालाला पाचारण करण्यात आले मात्र त्या रूमपर्यंत जाण्यासाठी अग्निशामक दल हे हतबल होते कारण त्या उपजिल्हा रुग्णालयात पर्यंत जाणारा रस्ता अरुंद असल्याने अग्निशामक दल तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हते मात्र त्यावेळेस अग्निशामक दलाला एक ना अनेक पाईप जोडून तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागला .
त्यानंतर ही आग विजवण्याचा प्रयत्न करावा लागला मात्र सध्या आग आटोक्यात आली असल्याचं जरी कळत असले तरीही आग शॉर्ट सर्किटने लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे . अनेक रुग्ण या आगीमुळे भयभीत झालेली देखील पाहायला मिळतात मात्र यामध्ये भरपूर नुकसान झाल्याचे ही प्राथमिक माहिती पुढे येत आहे .
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!