वादळवार्ता वार्तांकन – शाहेद खतीब
केज शहराती रहिवास असलेले. जयराम भागवत पवार वय ५० वर्ष त्यांची पत्नी सौ. अर्चना जयराम पवार वय ४६ वर्ष मुलगा कुमार नंदकुमार जयराम पवार वय ८ आठ वर्ष यांना अज्ञात वानाने धडक दिली. त्यामध्ये नंदकुमार जयराम पवार हा जागीच मृत्यू पावला तर त्याचे आई-वडील गंभीर जखमी झाले. त्यांना बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले होते. परंतु त्या दोन्हीही जखमीची परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचाराकरिता.सौ. अर्चना जयराम पवार यांना घाटी रुग्णालय औरंगाबाद येथे हलवण्यात आले. तर जय राम भागवत पवार यांना आंबेजोगाई येथील रुग्णालयात हलवण्यात आले. दोन्हीही जखमीची परिस्थिती चिंताजनक असल्याचे माहिती मिळाली आहे. सदरील घटना कशी व कोणत्या कारणाने झाली. याची माहिती अद्यापही कळाली नाही. नंदकुमार पवार यांच्या मृत्यूची माहिती कळताच परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!