केज । प्रतिनिधी
आ.संदीप क्षीरसागर यांच्या नागरी सत्कार प्रसंगी मनोगत व्यक्त करताना अनावधानाने आपले बाबद संशय निर्माण करणारी बातमी कुणाला संशय आला म्हणून केल्याचे आपण म्हटले. यावेळी आपण केज मतदार संघात जीवाचे रान करत प्रचार केला व प्रचार यंत्रणा सांभाळली असे असताना माझ्या भूमिकेवर संशय निर्माण करणारी बातमी देखील माझ्या सारख्या कार्यकर्त्यास मनस्ताप देणारी ठरली. यातून सदरील पत्रकार मित्राकडे तक्रार वजा बोलताना संशय आपणास का घरच्या कुणाला आला असे म्हटले गेले.
यावेळी उल्लेख केलेल्या शब्दानी कुणाच्या भावना दुखाव्यात अशी आपली अजिबात इच्छा अपेक्षा नव्हती. मात्र याने माझ्या राजकीय प्रवासात माझ्या सोबत कायम राहिलेल्या माझ्या अनेक सहकारी मित्रांचे मन दुखावले. अश्या सर्व माझ्या मित्राकडे मी दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या पत्रकार मित्राना दिलगिरी सोबतच हे आवाहन करतो की आपण माझे टिकाकार सल्लागार आहात मी टिकेचे आणी सल्याचे नेहमी स्वागत करत आलोय पुढेही करणारच आहे मात्र आपल्यातील निवडक मित्र ठरवून बदनामी संशय निर्माण करत असतील तर आपण पत्रकार म्हणून अश्या मित्रांना योग्य मार्गदर्शन करावे.मला विश्वास आहे आज ज्या प्रमाणे माझ्याकडे आपण व्यक्त झालात असेच भविष्यात चुकीच्या बातमीला बंध घालाल.बाकी मी माझ्या वक्तव्याने कुणाचे मन दुखावले बाबद दिलगिरी व्यक्त करत आहे. असे पत्र काढुन दिलगिरी व्यक्त केली आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!