आपला बीड जिल्हाआपले केज

कोतवाल कर्मचाऱ्यांनी सबंधित सज्जा कार्यालयीच उपस्थित राहावे :- प्रवीण खोडसे

वादळवार्ता वार्तांकन – केज

केज तहसील अंतर्गत तालुक्यातील तलाठी सज्जा कार्यालयी कोतवाल कर्मचारी हे सज्जावर हजर राहत नसल्याच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत.कोतवाल कर्मचाऱ्यांना सज्जा कार्यालयी पाठववावे असे वरिष्ठ कार्यालयाचे पत्र असताना देखील हे कर्मचारी प्रत्यक्ष इतरत्र कामावर असतात.कोतवालांनी सबंधित सज्जा कार्यालयास उपस्थित राहण्यासंदर्भात मांजरा विकास सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद असे की, कोतवाल कर्मचारी हे सज्जावर हजार नसतात व कामात कुचराई करतात.केज येथूनच संबंधीतास टपाल फोन करून देतात व संबंधित गावात जात नाहीत व काही कोतवालांची तर गावात ओळखच नाही;कि या गावाला कोण कोतवाल आहे ? थोडक्यात उंटावरून शेळ्या हाकलणे चा प्रकार आहे. संबंधित सज्जावरील कोतवालास तहसील कार्यालय केज व अन्य खाजगी कामावर न थांबविता प्रत्यक्ष त्यांची नेमणूक ज्या सज्जावर आहे त्याच सज्जावर कार्यरत राहणे बाबत आदेशित होणे गरजेचे असून तालुक्यातील सर्व सज्जा वरील कोतवालाना आपापल्या सज्जावर वेळेत हजर राहणे बंधकारक करणे गरजेचे आहे,जेणे करून गोर गरीब जनतेचे प्रश्न वेळेवर मार्गी लागतील व तालुक्यातील नोटीस धारकांना वेळेवर टपाल मिळू शकेल असे निवेदनात नमूद केले आहे.

कोतवाल कर्मचाऱ्यांना तात्काळ सज्जावर पाठवावे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईलअसा इशारा प मांजरा विकास सामाजिक प्रतिष्ठाचे अध्यक्ष प्रवीण खोडसे यांनी निवेदाद्वारे दिला आहे .

निवेदनावर अमोल गोरे,हमीद शेख, बंडू मुंडे,डी.एम. मुजमुले यांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!