वादळवार्ता – शेख शाकेर /नेकनुर
नेकनुरचा बाजार म्हटले कि प्रसिद्ध जनावरांचा बाजार पंचक्रोशीतील तथा बाहेर गावातिल नागरीक या बाजारास येतात. परंतु या आठवडी बाजारात भयंकरच घटना घटली ती म्हणजे बाजारात घुसला पिसाळलेला कुत्रा मंग काय सगळीच धांदल.
याबाबत वृत असे कि बीड जिल्यातील नेकनुरमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने 18 पेक्षा जास्त नागरिकांना चावल्याने एकच खळबळ उडाली आहे. रविवारी आठवडी बाजार असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होती याच गर्दीत पिसाळलेले कुत्र शिरल्याने तब्बल 18 जणांना चावा घेतला. यात तीन लहान मुलांचा समावेश आहे. आठवडी बाजारात शिरलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ पहायला मिळाला.
भगवान महादेव बांगर (वय 90), ईश्वरी विश्वनाथ शेळवकर (वय 06), स्वरा लोखंडे (वय 04), अजय धनाजी जगताप (वय 32), धनंजय काळे (वय 32), वैष्णवी सुरवसे (वय 13), वैष्णवी चोबे (वय 12),प्रांजली भांडवलकर (वय 18), तुळशीराम राऊत (वय 31), शेख शाहेद (वय 32), लेद (वय 52), आणिजा सय्यद (वय 47), बप्पा मोरे (वय 45), शाम गणगे (वय 42), प्रकाश वेदपाठक (वय 32), आर्यन काळे (वय 06), सदाशिव बांगर (वय 38) यांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेला आहे.
सर्वात मोठी नेकनुरची ग्रामपंचायत असुन संध्या प्रशासक असल्यामुळे प्रशासकाची जरब व लक्ष नसल्यामुळे मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट नेकनुर परिसरात दिसत आहे. त्यातच पिसळालेल्या कुत्र्याने आठवडी बाजारात धुमाकुळ घातल्या मूळे लहान – वृद्ध भयभीत अवस्थेत आहेत .
नेकनुर प्रशासक मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त लावतील का ? ग्रामसेवक लक्ष देतील का ? बंदोबस्त न लावता कुत्र्याने आणखी कांही जणांचा चावा घेतला तर याला जबाबदार कोण ? आदि प्रश्न नेकनूर ग्रामस्थांना पडले आहेत.