वादळवार्ता – केज
केज शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधील बीड- अंबाजोगाई रोड लगत भवानी चौकाच्या कांही अंतरावर नावाने दुधडेअरी डिपी म्हणून असणारा डिपीने महावितरणच्या अधिकारी – कर्मचार्यांची चांगलीच दमछाक उडवली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि केज शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधील असणारा दुधडेअरी डिपी चांगलाच प्रसिद्ध झाला आहे त्याचे कारणही तसेच आहे . सदरील डिपी हा सारखाच जळत असल्यामुळे महावितरणचे कर्मचारी चांगलेच बेजार झाले आहेत. दुधडेअरी डिपी हा सुरुवातीला ३१५ पावरचा होता. तो जळाला म्हणुन २०० पावरचा डिपी बसवला परंतु परत ३१५ पावरचा डिपी अंबाजोगाई वरून आला म्हणून परत २०० चा काढुन ३१५ चा बसविण्यात आला परंतु लगेच तो डिपी नो लोड वरती गेला पुन्हा २०० पावरचा डिपी बसवला तो चांगला चलत असताना परत बीडवरून ३१५ पावरचा डिपी आला असता पाच मिनीटामध्येच नो लोड वरती जळाला म्हणून परत २०० पावरचा डिपी बसवला तो सध्या सुरू असला तरी विभागुन विज वितरण करावे लागत आहे. परंतु २०० पावरचा डिपी सुरळीत चालतो तर ३१५ पावरचा का नाही ? ज्या ठिकाणी डिपी भरला जातो त्या एजन्सीज डिपी चेक करून देत नसल्यामुळे वा व्यवस्थित डिपी भरत नसल्यामुळेच डिपी सातत्याने जळत आहे असे कर्मचारी, अधिकारी यांचे म्हणणे आहे. मात्र यामुळे महावितरणचे केज शहर शाखा अभियंता महेश अंडिल व त्यांचे कर्मचारी डिपी बसवणे व काढणे यातच बेजार झाले आहेत. वरती सातत्याने ग्राहकांचे फोन येत असल्यामुळे कर्मचारी त्रस्त व नागरीकही त्रस्त मात्र डिपी भरणारे मौज मजेत आणी मस्त आहेत.
सदरील डिपी सातत्याने ८ दिवसापासून जळण्यामुळे महावितरणचे कर्मचारी तथा ग्राहक बेजार झाले असता वरिष्ठ अधिकारी यांनी डिपी भरणाऱ्या एजन्सी वरती कारवाई करण्याची मागणी ग्राहक करू लागले आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!