Uncategorized

केज मध्ये जश्ने ईद-ए-मिलाद दुन्नबी उत्साहात संपन्न

केज मध्ये जश्ने ईद-ए-मिलाद दुन्नबी मोठया उत्साहा आणि जोशपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

वादळवार्ता वार्तांकन – मुबाशीर खतीब

इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त दि. ९ ऑक्टोबर रोजी जश्ने ईद-ए-मिलाद दुन्नबी साजरी करण्यात आली. त्या निमित्त केज शहरातील मुस्लिम बांधवांनी प्रचंड मिरवणूक काढली. यात सर्व आबालवृद्ध पारंपरिक पेहराव करून सहभागी झाले होते. या मिरवणुकी मध्ये चौका चौकात आणि रस्त्यावर फराळाचे मोफत स्टॉल लावून त्या द्वारे मसाला दूध, पाणी फळे आणि खाद्य पदार्थ वाटप करण्यात आली. पत्रकार मुबशिरोद्दीन खतीब आणि शाहनवाज खतीब यांच्या स्टॉलवर सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे आणि पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्या हस्ते मिरवणुकीत सहभागी असलेल्याना फराळ व पाणी वाटप करण्यार आले.

या वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!