आंदोलनाचा इशारा शेतकरी व व्यापाऱ्यांची जिल्हाधिकार्यांनकडे निवेदनाद्वारे मागणी
वादळ©वार्ता – शेख शाकेर
नेकनुर दि. १९ (प्रतिनिधी ) बीड जिल्ह्य़ातील नेकनुर येथे मराठवाडय़ातील सर्वात मोठा आठवडी बाजार भरत असुन या मध्ये जनावरांचा मोठा बाजार आहे. येथे राज्यातुन व परराज्यातून जनावरांचे व्यापारी येतात जनावरांच्या खरेदी विक्रीतून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते आहे. तसेच या बाजारावर अनेकांची उपजीविका चालते आहे.
लंपी स्किन या आजारामुळे शासनाने जनावरांचे बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला होता. अनेक दिवसांपासून बाजार बंद असल्याने अनेक छोटे मोठे व्यापारी व इतर छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच जनावरांमध्ये लंपी स्किन आजार कमी झालेले दिसत आहे म्हणून नेकनुरचे जनावरांचे बाजार सुरू करण्यात यावे अशा मागणी जिल्हाधिकारी बीड यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
नेकनुर येथील जनावरांचे बाजार सुरू करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन देणाऱ्या असंख्य शेतकरी व व्यापाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नेकनुर आणि परिसरात जनावरांमध्ये लंपी स्किन हा आजार कमी दिसत आहे.
जनावरांचे बाजार अनेक दिवसांपासून बंद असल्याने शेतकरी दुहेरी संकट मध्ये सापडला आहे. तसेच बाजारावर अवलंबुन असलेले व्यापारी व इतर व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. इतर शेजारी जिल्ह्य़ातील बाजार सुरू झाले आहेत म्हणून नेकनुरचे जनावरांचे बाजार लवकरात लवकर सुरू करा नसता शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर ग्रा. पं.चे गटनेते सय्यद साजेद अली उर्फ बाबुभाई, मा. ग्रा. पं सदस्य शिवाजी शिंदे,ग्रा.पं सदस्य तथा पत्रकार सय्यद खालेद, ग्रा. पं सदस्य ईजहारोदीन जहागीरदार, सुदाम भोसले, जफर पाशा जागीरदार, मिर्ज़ा फरहत बेग, शेख गफार,शेख हिदायत, शेख मुजम्मिल बाबा सेठ, शेख अलीम, शेख सलीम बागा,मुसद्दीक बेग, शेख समीर, काझी रईस, शेख सिराज, सय्यद खाजा आदी असंख्य शेतकरी व व्यापाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!