आपला बीड जिल्हाक्राईम

बीड मध्ये घरफोडी, माजलगावात मोटारसायकल चोरी,गेवराईत टेंम्पो चोरी तर अंमळनेरात पवनचक्की च्या सामानावर चोरट्यांचा डल्ला 

वादळवार्ता वार्तांकन – गणेशभाऊ ढाकणे

बीड शहरातील बोबडेश्वर गल्ली सराफी लाईन मधिल मंगल कोळगावकर यांच्या वाड्यात रात्री चोरट्यांनी भींतीवरून चढत प्रवेश करून लटकवलेल्या चाव्या घेऊन कपाटातील सोन्याचे दागीणे तसेच नकदी असा 3 लाख 88 हजाराचा माल चोरीस गेल्याने अज्ञाता विरूद्ध बीड शहर पोलीस स्टेशनला कलम 457,153,380 नुसार गुन्हा नोंद आहे .

गेवराई तालूक्यातील

पोखरी येथील गोविंद मोघे  वय 42 यांचा टाटा कंपनीचा तपकिरी रंगाचा टैम्पो त्याचा पासिंग क्र एम एच 14 सीपी 6666 ज्याची किंमत  4 लाख रू किमतीचा अज्ञात चोरांनी पहाटे 4 ते 5..30 दरम्यान अज्ञाताने चोरून नेल्याने गेवराई पोलिस स्टेशन मध्ये कलम 415 379 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला

गोशाळेतील गाईवर पण भुरट्यांनी मारला हात

बीड ग्रामीण पोलिस स्टेशन हदीतुन प्रीती सूधाजी गोशाळा घोसापूरी  येथुन अज्ञात चोराने गुरुवार रोजी रात्री आठ वाजे दरम्यान गोशाळे चे कुलूप तोडूण  चार गाई चोरी स गेल्याने बीड ग्रामीण पोलिस स्टेशन ला विलास पाटील यांच्या फिर्यादी वरुन गुन्हा नोंद आहे

पवनचक्की च्या सामानावर ही चोरांचा डल्ला

अमंळनेर पोलिस स्टेशन हदीतील मुरगाव शिवारातील गट नं 755 मधील पवनचक्की बायोटेक व्हिजन केअर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या 5 नं पवनक्की चे सामान व इलेक्ट्रीक सामान असा माल किमंत 8 लाख  अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याने सी रत्नाकर यांच्या तक्रारीवरून अंमळनेर पोलिस स्टेशन ला कलम 89/ 379 नूसार गुन्हा नोंद आहे

माजलगाव शहरातील

समता कॉलनी येथील रहिवासी शरद कदम यांची हिरो कंपनीची एच एफ डिलक्स  मोटार सायकल जिचा पासिंग क्रंमाक एम एच 44 एल 6419 ही समता कॉलनी परिसरतुन गुरूवार रोजी चोरी गेल्याने  शहर पोलीस स्टेशन ला कलम 225 ,379 नुसार गुन्हा नोंद आहे ,

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!