आपला बीड जिल्हा

केज रोटरीच्या पुढील अध्यक्षपदी श्रीराम शेटे तर सचिवपदी अरुण नगरे

वादळवार्ता वार्तांकन – मुबशिर खतीब

रोटरी क्लब ऑफ केज ची बैठक नूतन अध्यक्ष पशुपतीनाथ दांगट व सचिव सूर्यकांत चवरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली.

या बैठकीमध्ये पुढील 2023-2024 या रोटरी वर्षासाठी अध्यक्षपदी केज शहरातील व्यापारी श्रीराम दत्तकुमार शेटे यांची तर सचिव पदी शहरातील व्यापारी अरुण किसनराव नगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत भोसले यांनी घोषित केले आहे.

रोटरी क्लब ऑफ केज या जागतिक सामाजिक संस्थेची स्थापना केज शहरात 2005 साली झाली. तेव्हापासून आजपर्यंत वेगवेगळ्या अध्यक्षांनी आपापल्या कार्यकाळात उत्कृष्ठ कार्य केले आहे. रोटरी विश्वात प्रत्येक अध्यक्षास 01 जुलै ते 30 जून असा फक्त एक वर्षाचाच कार्यकाळ असतो. क्लबने आज पर्यँत शहरात विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा उपक्रम राबवले आहेत. कोरोना काळातही केज रोटरीने समाजजागृतीचे मोठे कार्य केले आहे.

रोटरी क्लब ऑफ केज या प्रतिष्ठित संस्थेच्या 2023-2024 या पुढील रोटरी वर्षांसाठी अध्यक्षपदी श्रीराम शेटे यांची निवड करण्यात आली आहे. श्रीराम शेटे यांचे बीड रोड लगत प्रसिद्ध मंगल कार्यालय असून त्यांचे शहरात श्रीराम टाइपिंग इस्टिट्यूट व्यवसाय आहे. पुढील सचिवपदी अरुण नगरे यांची निवड करण्यात आली. अरुण नगरे यांचे कळंब रोड लगत अरुण मशिनरी चा व्यवसाय आहे.

पुढील कार्यकाळात केज शहरासाठी महत्वाचे उपक्रम राबविणार असल्याचे पुढील अध्यक्ष व सचिव यांनी संकल्प केला आहे.

पुढील अध्यक्ष व सचिव यांचे केज रोटरी परिवार व इतर सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!