वादळवार्ता – केज
केज तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी हयात असल्याचे प्रमाणपत्र पुढील प्रमाणे प्रत्येक गावातील दिलेल्या कालावधीत सादर करावे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचे शासन निर्णय २० ऑगस्ट, २०१९ तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या शासन निर्णय ३ मे, २०२१ नुसार या केज तहसील कार्यालयास संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ योजनेच्या अनुषंगाने केज तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना प्रत्येक गावामधील केज तहसिल कार्यालयाने दिलेल्या तारखेच्या कालावधीत हयात असल्याबाबत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेणारे लाभार्थ्यांनी हयात असल्याबाबत प्रमाणपत्र, शिधापत्रिकेची छायांकित प्रत, आधारकार्ड, मतदान कार्ड ,परिशिष्ट-१० मधील तहसीलदार यांचेकडील उत्पन्न प्रमाणपत्रासह सादर करण्यात यावे .
केज तालुक्यातील लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात न येता आपापल्या गावात दिलेल्या तारीख व वेळेला हजर राहावे असे आवाहन केजचे तहसिलदार दुलाजी मेंडके यांच्या वतीने करण्यात आले आहे.
हयात प्रमाणपत्र सादर करावयाची गावनिहाय दिनांकाचा तक्ता पुढीलप्रमाणे आहे.


नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!