वादळवार्ता वार्तांकन – धारूर
धारूर तालुक्यतील काटेवाडीच्या शिवरातील दरीमध्ये पडलेला मुंडे शेतकरी यांचा राजा नावाचा बैल 14 दिवसांच्या संघर्षानंतर मरण पावला.
सविस्तर वृत्त असे कि धारूर तालुक्यातील काटेवाडी च्या शिवारातील दरीत मागील चौदा दिवसांनपासून दरीत पडलेल्या राजा बैलाला वाचविण्यासाठी शेतकरी बालासाहेब मुंडे तब्बल 14 दिवस बैलासोबतच राहुन त्याची सेवा करायचे . बैलाला जागेवरून उठता येत नसलेमुळे व त्याच्या शरीराच्या पाठीमागील भागास दुःखापत झालेमुळे बालासाहेब मुंडे त्याच्याजवळच बसुन असत मात्र त्यांचे शेतकरीपुत्र नामादेव मुंडे प्रशासनाच्या, शासनाच्या पायऱ्या झिझवुन बैलाला कसे घरी नेता येईल यासाठी आतोनात प्रयत्न करत होते. परंतु प्रशासनाने सकारात्मक बाबींचा विचार न करता नकारात्मक बाबी समोर करुण स्वःताचे हात झटकले, मात्र लोकनेत्या पंकजाताई मुंडे , खा. प्रितमताई मुंडे यांनी प्रयत्न केले परंतु तोपर्यंत राजा बैलाने जिव सोडला व 14 दिवसांचा संघर्ष संपला. राजा बैलाचा अंतिम संस्कार शेतकरी बालासाहेब मुंडे यांनी कुटुंबासमवेत दरीमध्येच केला.
केंद्र शासन , राज्य शासनाने गोवंशाचे सरंक्षण करण्याकरीता असंख्य गोशाळा सुर केल्या त्यासाठी कायदा बनवला. एकिकडे कत्तलखान्याकडे जाणार्या जनावरांचे रंक्षण करून गो शाळेत दाखल करायचे तर दुसरीकडे संकटात सापडलेल्या दरीत कोसळलेल्या गोवंशाला एकटे मरण्यासाठी सोडुन द्यायचे. यालाच गोवंश सरंक्षण म्हणायचे का ?