वादळवार्ता वार्तांकन – महादेव काळे
गेल्या बऱ्याच दिवसापासून मानसिक रुग्न असलेला नाव्होली येथील तरुण शुक्रवार दि. २५ नोहेंबर २०२२ रोजी घरात कोणालाही न सांगता सांयकाळी ६ ते ७ च्या दरम्यान नाव्होली येथुन केज नांदूरघाट रस्त्याने पाई चालत नाव्होली कडुन उ.पिंप्री च्या दिशेने गेला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी कि नाव्होली येथील तरुण दत्तात्रय सुदाम बिक्कड वय ३१ वर्षे हा तरुण सुशिक्षित असुन तो अत्यंत हुशार आहे. बऱ्याच दिवसापासून त्याच्या डोक्यावर परिणाम झाला असुन या मनोरुग्न असलेल्या दत्तात्रय बिक्कड याच्यावर औषध उपचार सुरु आहेत.
परंतु दि. २५ नोहेंबर २०२२ शुक्रवार रोजी सांयकाळी ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास केज नांदूरघाट राज्यमार्गावरुन नाव्होली कडुन केजकडे जाणाऱ्या रसत्यांनी उ. पिंप्री च्या दिशेने दत्तात्रय सुदाम बिक्कड हा वेड्याच्या लहरित निघुन गेला आहे. त्याला देव, धर्माचा जास्त आवड असल्याने तो धार्मिक ठिकाणी असण्याची शक्यता त्यांच्या आई वडील व नातेवाईक यांनी कळवले आहे. तर तो केज तालुक्यातील अथवा इतर ठिकाणच्या धार्मिक ठिकाणी असण्याची शक्यता असल्याने कोणाला दिसल्यास अथवा सापडल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा…
संपर्क नंबर. ९०९६०३८६७९ , ७७४१९७१९१९