आपला बीड जिल्हा

केज पोलिसांचे नियोजन, जनसंपर्क आणि कर्तव्यदक्षपणा यामुळे गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडला

मनसे मार्फत केज पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी व कर्मचारी बांधवांचा कृतज्ञता सत्कार.

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शांततापूर्ण वातावरणात गणेशोत्सव पार पाडला या बद्दल मनसेच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुमंत धस आणि तालुका अध्यक्ष कल्याण केदार यांनी सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा फेटे बांधून सत्कार करून ऋण व्यक्त केले.

गणेशोत्सवा दरम्यान केज पोलीस केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे आणि त्यांचे अधिकारी व कर्मचारी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली दिवस -रात्र आपले कर्तव्य पार पाडले. गणेश उत्सव व विसर्जन मिरवणुका शांततेत संपन्न झाल्या. त्या बद्दल बीड जिल्हा मनसेच्या वतीने त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्हाध्यक्ष सुमंत धस, केज तालुकाध्यक्ष कल्याण केदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे आणि महिला व पुरुष पोलीस कर्मचारी यांचा शाल, फेटा, पुष्पगुच्छ व हार घालून कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!