वादळवार्ता वार्तांकन – महादेव काळे
दि.28 : केज येथील शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या रविवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 17 शिक्षकांना शिक्षक रत्न पुरस्कार , 3 शिक्षकांना विशेष पुरस्कार ,10 सेवा निवृत्त शिक्षकांचा, आणि मेडिकल पूर्ण झालेल्या व चालू वर्षी मेडिकल ला लागलेल्या 12 गुणवंतांचा या वेळी मान्यवारांच्या हस्ते फेटा बांधून, व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
पतसंस्थेचे अध्यक्ष सज्जन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या वार्षिक सर्वसाधारण सभेस प्रमुख पाहुणे म्हणून बीड जि. प. चे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे जेष्ट नेते श्री बजरंग बप्पा सोनवणे,नगराध्यक्षा सिताताई बनसोड, संतोष हंगे,दत्ता धस, गट शिक्षण अधिकारी सुनिल केंद्रे, दत्ता चाटे, भाऊसाहेब गुंड, प्रा. हनुमंत भोसले , जी. बी.गदळे , पत्रकार गौतम बचुटे, यांचे सह पतसंस्थेचे सर्व संचालक व सभासद आणि कर्मचारी हजर होते.
यावेळी शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानीत केलेले शिक्षक –
श्री कांबळे बाबासाहेब दादाराव (सुर्डी ), श्री गायकवाड आश्रुबा रामलींग ( सोनेसांगवी नं. २) , श्री ढेंगळे बालासाहेब किसनराव , श्री जाधव तानाजी वसुदेव -(वाघेबाभुळगाव) ,श्रीमती चंदनशिवे अर्चना व्यंकटराव (पिंपळगाव) , श्रीमती जगदाळे अश्विनी आनंदराव (उमरी ),श्रीमती वानखेडे मंजुषा गोविंदराव(वरपगाव ) ,श्रीमती पवार दिपाली बाळकृष्ण (तांबवा ) ,श्रीमती गायकवाड अनिता रोहिदास (केकाणवाडी) ,श्रीमती धेंडे रेखा श्रीपतराव(बनसारोळा) ,श्री जाधवर अनंत नानाभाऊ (नागझरी) ,श्री घोरपडे प्रकाश कल्याणराव काळेगाव (घाट) ,श्रीआंबाड बालासाहेबरामभाऊ (पांडूरंगवस्ती) , श्री वरवडे रमेश सिताराम -(पिट्टी घाट ) ,श्रीम. चौहाण आशा बाबुसिंग , श्री. जगदाळे लक्ष्मण दामोदर ,श्री. पाळवदे चंद्रकांत मोतिराम(देवगाव) , श्री. जाधव प्रक्षिती पोपटराव(नांदुरघाट) ,श्री अंबाड दिलीप बब्रुवान(खरमाटा) ,विषेश पुरस्कार देऊन डॉ श्री मुळे रामकिशन ग्यानबा(शिक्षणशास्त्र पीएचडी ) ,श्री देशमुख तुकाराम कल्याणराव (केंद्रप्रमुख बनसारोळा ) , श्री काळकुटे भारत भगवानराव केंद्रिय मुख्याध्यापक (केज मुलांची) यांचा फेटा बांधून व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ रामकिशन मूळे आणि लोंढे यांनी तर आभार संजय चौरे यांनी मानले. वार्षिक सभेनंतर सर्व सभासदांना सहभोजनाची सोय करण्यात आली होती.
सेवानिवृत्त शिक्षक व गुणवंतचाही सत्कार
यावेळी केज तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षक श्री. गव्हाणे शुक्राचार्य व्यंकटराव श्री. घाडगे मारुती गोरख श्री. शेख अब्दुल समद बाबागियाश्री. कल्याणकर शाम गोविंदरावश्री. अन्सारी मोहम्मद अलीमोद्दीन अहेमदश्री. बारगजे मल्हारी खंडू ,श्री. बचुटे विष्णू संभाजी श्री. बारबोले राजेंद्र शिवाजी ,श्री. शेख रईसोदीन रिजवानोदीन ,श्री.राऊत बबन साधू यांचे सह मेडिकल पूर्ण करणाऱ्या व यावर्षी मेडिकलला लागलेल्या शिक्षकांच्या पाल्यांचाही सत्कार करण्यात आला. यात श्रीकृष्ण अशोक चाटे,मयुरी बाबासाहेब सारुक,वैष्णवी बळीराम डोईफोडे, प्रतिक्षा महादेव काळे, स्वप्निल संजय चवरे,देशपांडे श्वेताली अजयराव, व्यंकटेश प्रदिप जोगदंड (पाटील), शितल जनक कद, संकेत हनुमंत तपसे, प्राजक्ता गजेंद्र देशमुख , सौरभ बालासाहेब मस्के, श्रुती शिवाजी रोडे, सुमित सुनिल केंद्रे ,पुनम लक्ष्मण डोईफोडे यांचा समावेश आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!