आपला बीड जिल्हा

केज येथील उंच पाण्याची टाकी झाली लहान मुलांची सेल्फी काढण्याची ,खेळण्याची जागा!

सुरक्षा रक्षका अभावी टाकिची सुरक्षा , केज शहरातील नागरीकांचे आरोग्य वाऱ्यावर!

वादळवार्ता वार्तांकन – अजय भांगे

केज शहरातील नागरीकासाठी पाण्याची व्यवस्था व्हावी याकरिता पाण्याची टाकी बांधली आहे . तसेच या पाण्याच्या टाकीमधुन संपुर्ण केज शहराला पाणीपुरवठा केला जातो . सुरुवातीला याचे चांगले नियोजन केले होते .

परंतु सध्या पाण्याच्या टाकीच्या परिसरामध्ये कसल्याच प्रकारे सुरक्षेची काळजी घेतली जात नसल्यामुळे, सदरील पाण्याच्या टाकीवर लहान – लहान मुले – मुली सेल्फी काढताना तसेच खेळताना दिसत आहेत .

जर लहान मुले सुरक्षाअभावी , नियोजनाअभावी वरती जाऊ शकतात तर इतर अनोळखी व्यक्ती का जाऊ शकत नाही ? आणी जर लहान मुले खेळताना पाण्याच्या टाकीमध्ये अथवा खाली पडली ; जीवीतहानी झाली तर याची जिम्मेदारी केज नगरपंचायत घेणार का ?

जर अनोळखी व्यक्तीने येऊन पाण्याच्या टाकीमध्ये विषबाधा करण्याचा प्रयत्न केला व त्यामुळे केज शहरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले तर याचीही जिम्मेदारी केज नगरपंचायतचे प्रशासन घेणार का ?

असे असंख्य प्रश्न केज शहरातील नागरीकांनच्या चर्चेव्दारे दिसुन येत आहेत . केज नगरपंचायत चे नव्यानेच रूजु झालेले मुख्याधिकारी विशाल पाटील हे केजच्या पाण्याच्या टाकीच्या सुरक्षेचे प्रश्न हाताळतील कि नाही तसेच पाण्याच्या टाकीमधील कचरा व्यवस्थापन करण्यासाठी १७ कचरापेट्या, ट्रक्टर , घटांगाड्या , कचरा विघटन यंत्र यांचे व्यवस्थापन करतील का ? अशी केज शहरातील नागरीकांनमध्ये चर्चा होत असताना दिसत आहे

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!