आपला बीड जिल्हा

पिकअपचे टायर फुटल्याने ड्रायव्हरचा ताबा सुटुन मारोती ईको गाडीला धडक : एक ठार एक जखमी

पिकअपचे टायर फुटल्याने ड्रायव्हरचा ताबा सुटुन मारोती ईको गाडीला धडक : एक ठार एक जखमी

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

अंबाजोगाई रोडवर चंदन सावरगाव जवळील निसर्ग ढाब्याच्या जवळ मारुती ओमीनी इको आणि पिक-अपचा समोरा समोर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यु झाला तर दुसरा एकजण जखमी झाला आहे.

या बाबतची अधिक माहिती अशी की, शनिवार दि. १७ सप्टेंबर रोजी दुपारी ३:३० वा च्या दरम्यान केज अंबाजोगाई रोडवर चंदन सावरगाव जवळील हॉटेल निसर्ग जवळ अंबाजोगाई कडून केजकडे येणारे पिक-अप क्र. (एम एच-४३/ए डी-७२१०)चे टायर फुटल्याने ड्रायव्हरचा ताबा सुटुन समोरून केज कडून अंबाजोगाईकडे जाणाऱ्या मारुती ओमिनी इको क्र. (एम एच-१३/सी के-२६१४) या गाडीला समोरा समोर धडक दिली. यात ओमीनी इको मधील कपड्याचे व्यापारी महेश अंबादास पेटलपट्टी २७ रा. सोलापूर यांचा मृत्यू झाला तर व्यंकटेश भुपेंद्र इंगे ४७ रा. सोलापूर हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच अपघातातील जखमींना नागरिकांनी रुग्णवाहिकेतून स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे दाखल केले. युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहिफळे यांच्या आदेशाने पोलीस नाईक संपत शेंडगे हे अपघातस्थळी दाखल झाले. त्यांनी पुढील कारवाई केली.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!