Uncategorized

लैंगिक अपराधा बाबत शंकर वाघमोडे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

वादळवार्ता – गौतम बचुटे

लैंगिक अपराधाला वेळीच आळा घालण्यासाठी जाणून बुजून कोणी लगट करीत असेल किंवा स्पर्श करीत असेल तर ती ओळखण्याची मुलींना समज आल्यास अपराध टाळले जाऊ शकतात आणि गुन्हेगारांचा बंदोबस्त करता येऊ शकतो त्यासाठी गुड टच आणि बॅड टच या संदर्भातील माहिती तलवडा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी शाळेत अयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात दिली.

दि.३१ जुलै रोजी गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात शेतकरी योद्धा प्रतिष्ठान मार्फत वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या हस्ते वृक्षारोपण झाल्या नंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाघमोडे यांनी लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम याची माहिती दिली. तसेच गुड टच आणि बॅड टच कसा ओळखावा याची माहिती दिली.

या बाबत काहीही तक्रार असल्यास तात्काळ पोलिसांना कळवविण्याची सूचना देण्याबाबत सांगून स्वतःसह पोलीस अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर दिले. त्याच बरोबर शाळेमध्ये तक्रार पेटी लावणे बाबत आव्हान केले.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!