आपला बीड जिल्हा

स्कुल बस – मोटर सायकल अपघातामध्ये तीघे ठार 

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

 केज बीड रोडवर एक मोटार सायकल आणि शाळेच्या गाडीचा अपघात होऊन त्यात मोटार सायकल वरील तिघे गंभीर जखमी झाले होते त्यात तिघांचाही मृत्यू झाला आहे.

केज-बीड रोडवरील कोरेगाव जवळ शनिवार दि. २४ सप्टेंबर रोजी दुपारी २:०० वा. च्या दरम्यान बन्सल क्लासेसच्या विद्यार्थी उतरण्यासाठी रस्त्यात उभ्या असलेल्या गाडी क्र. (एम एच-४४ /९९९६) ला मोटार सायकलीने क्र. ( एम एच -१३/बी जे ८५७४) ने जोराची धडक दिली. यात मोटार सायकलवरील सुनील मधुकर शिंदे वय (२५ वर्ष) रा. पिंपळगाव ता. केज हा उपचारासाठी घेऊन जात असताना मृत्यू पावला तर दिपक कल्याण पवार वय (२० वर्ष) हा आंबवजोगाई येथे गेल्या नंतर मयत झाला. तसेच भागवत कल्याण पवार वय (२२ वर्ष) रा. कोरेगाव ता. केज यांच्या डोक्याला व छातीला मार लागला असल्याने त्याला लातूर येथे हलविले असता त्याचाही मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात कोरेगाव येथील दोघे आणि पिंपळगाव येथील एकाचा समावेश आहे.

 

दरम्यान या रस्त्याने प्रवास करीत असलेले स्व लोकनेते गोपीनाथ मुंडे सहकारी सुतगिरणीचे चेअरमन प्रा. डॉ विजयकुमार ठोंबरे, भाजपचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, भाजपचे तालुका अध्यक्ष भगवान केदार, राष्ट्रवादीचे नेते बालाजीतांदळे आणि रिपाइंचे गौतम बचुटे यांनी रस्त्यात थांबून पोलीस दवाखाना व रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. जखमींना रुग्णवाहिका चालक मकरंद घुले यांच्या मदतीने आणि एका खाजगी कार चालकाने जखमींना स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात हलविले. जखमींची त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना केज येथील उपजिल्हा रूग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय अंबाजोगाई येथे हलविले होते.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!