वादळवार्ता प्रतिनिधी
गुटखाबंदी असतानाही कांही महाभाग गुटखातस्करी करण्यासाठी वेगवेगळ्या शकल्ल लढवित ,गुटख्याची तस्करी करत आहेत . अशीच गुटख्याची तस्करी करत असतानाची माहीती मिळताच परळीच्या संभाजीनगर पोलिसांनी ईटके कॉर्नर परिसरात डाक पार्सलचे कंटेनर अडवले असता त्यामधून सुमारे साडे दहा लाख रुपयांचा गुटखा मिळून आल्याने जिल्ह्यात गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत .
पो. ना. सचिन बाजीराव सानप यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी आरोपी सरफराज अहेमद दारुद (वय 35 वर्ष रा. तपकन ता. नुहु जि. मेवाड राज्य हरीयाणा) यास मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. आज पहाटे 03.50 वा. इटके कॉर्नर परळी येथे कंन्टेनर पासींग क्र.एच.आर.55 टी. 4271 मध्ये चालक सरफराज अहेमद दारूद याने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या मालाची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतुक करणारा कंटेनर आज परळी शहरातील ईटके कॉर्नर येथे पकडला.
या प्रकरणी गु.र.नं. 131/2022 कलम 328,272, 273 भा.द.वि.प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सरफराज अहेमद दारूद यास अटक करण्यात आली आहे. या कारवाईत 10 लाख 8 हजार रुपयांच्या 28 पांढऱ्या रंगाचे मोठे बोरे प्रत्येकी बोरमध्ये 8 पांढऱ्या रंगाचे पोते ज्यामध्ये प्रिमीयम राज निवास सुगन्धीत पान मसाला आढळून आला.
ज्याची किंमत अंदाजे 36 हजार रुपये असा एकूण 10 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल ज्याची किंमत 36000/- रुपये असा एकुण 1008000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, असा एकुण 19,48000/ रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पो. नि. एस. एस. चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. सी. एच. मेढके पो.स्टे. संभाजीनगर परळी पो.उप. नी. सी. एच. मेढके हे करीत आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!